'आयएसआय'साठी हेरगिरी करणारा अमृतसरमधून अटकेत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 मार्च 2018

अमृतसर (पंजाब): पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या एकाला अमृतसरमधून गुरुवारी (ता. 29) अटक करण्यात आली आहे. राज्य विशेष अभियान सेल (एसएसओसी) आणि भारतीय लष्कराच्या गुप्तहेर संस्थेने ही कारवाई केल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली.

अमृतसरमधील छतीविंड पोलिस स्टेशनच्या हद्दीतून रवी कुमार नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून महत्त्वाची कागदपत्रे, काही स्केचेस, लष्करीतळाची माहिती देणारी छायाचित्रे आदी साहित्य जप्त केले आहे. पोलिस निरीक्षक गुररिंगदल पाल यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

रवी कुमार याची सात महिन्यापूर्वी पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याशी फेसबुकवरून ओळख झाली होती. यानंतर, त्याने पाकिस्तानच्या आयएसआयसाठी काम करण्या सुरुवात केली. त्याने लष्कराचे नवीन बंकर्स, वाहने, विविध चिन्हे, भारतीय सीमेवरील माहिती त्याने दिली होती. 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान त्याने दुबई दौरा केला होता. शिवाय, तो सतत पाकिस्तानी आयएसआयच्या अधिकाऱयांशी संपर्कात होता, असेही पोलिसांनी सांगितले.

Web Title: Indian national spying for Pakistan’s ISI arrested in Amritsar