भारतीय नौदलाची पसंती राफेलला? INS विक्रांतसाठी राफेल-M चा विचार

INS विक्रांत ही स्वदेशी बनावटीची भारताची पहिली विमानवाहू युद्धनौका आहे. पुढच्यावर्षी ही युद्धनौका सेवेत दाखल होईल.
rafale jet.
rafale jet.

नवी दिल्ली: युद्ध प्रसंगात चीन (china) आणि पाकिस्तानवर (pakistan) अचूक प्रहार करण्यासाठी निर्णायक ठरणारी ३५ राफेल फायटर विमाने (Rafale fighter jet) २०२१ अखेरपर्यंत फ्रान्स भारताला देणार आहे. भारताने फ्रान्स बरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. त्यानुसार, वर्षअखेरपर्यंत भारताला ३५ राफेल मिळतील. उर्वरित एक विमान जानेवारी २०२२ मध्ये वायुदलात दाखल होईल. फ्रान्सने आतापर्यंत २६ राफेल विमाने भारताकडे सुपूर्द केली आहेत. त्यात २४ राफेल भारतामध्ये आहेत. उर्वरित दोन विमाने IAF चे वैमानिक आणि तंत्रज्ञानाना प्रशिक्षण देता यावे, यासाठी फ्रान्समध्ये ठेवली आहेत. (Indian Navy is looking at Rafale-M as a fighter option onboard INS Vikrant dmp82)

फ्रान्स भारताचा रणनितीक भागीदार आहे. राफेलच्या क्षमतेमुळे इंडियन एअर फोर्स बरोबर आता भारतीय नौदलही राफेलमध्ये रुची दाखवत आहे. कारण राफेलमध्ये समुद्री प्रहार करण्याचीही क्षमता आहे. IAF चा भविष्यात आणखी ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा विचार आहे. भारतीय नौदल राफेल-एम चा विचार करत आहे. स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतवर राफेल-M तैनात करण्याचा भारतीय नौदलाचा विचार आहे. पुढच्यावर्षी ही विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलात दाखल होईल. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

rafale jet.
मुंबईतील कोर्टाचा कंगनाला अंतिम इशारा, अन्यथा अटक वॉरंट अटळ

फ्रेंच बनावटीचे राफेल मिटिओर, स्काल्प, हॅमर अशा अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. हवाई युद्धाच्यावेळी शत्रूचे विमान पाडण्यासाठी अचूकतेने प्रहार करणारे क्षेपणास्त्र यामध्ये आहे. तसेच काहीशे किलोमीटर अंतरावरील शत्रूच्या तळावरही प्रहार करणारी शस्त्रे या फायटर विमानामध्ये आहेत. राफेलमध्ये युद्धाचे समीकरण बदलण्याची ताकत आहे. त्यामुळे इंडियन एअर फोर्स आणखी राफेल विमाने खरेदी करण्याचा विचार करतेय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com