Video : गोव्यात नौदलाचे मिग-२९ विमान कोसळले

टीम ई-सकाळ
Saturday, 16 November 2019

नौदलाचे मिग २९ के हे प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारे लढाऊ विमान वेर्णाजवळ कोसळले. विमानाला आग लागलेल्या अवस्थेत ते खाली आले.

पणजी (गोवा) : गोव्यात वेर्णाजवळ नौदलाचे प्रशिक्षणासाठीचे विमान कोसळले. नौदलाकडून वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी हे विमान वापरण्यात येत होते. दुर्घटनेनंतर दोन्ही वैमानिक सुखरूप आहेत.

Image may contain: cloud, sky, mountain, outdoor and nature

Image may contain: 1 person, shoes

नौदलाचे मिग २९ के हे प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारे लढाऊ विमान वेर्णाजवळ कोसळले. विमानाला आग लागलेल्या अवस्थेत ते खाली आले आणि मोकळ्या जागेत पडून जळाले. तत्पूर्वी., कॅप्टन एम. शिवखंड आणि लेफ्टनंट कमांडर दीपक यादव यांनी पॅरेशूटच्या आधारे बाहेर उडी मारली होती. नौदलाच्या हंस तळावरून या विमानाने उड्डाण केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian navy mig 29 crashes in goa both pilots are safe