ग्लायडर क्रॅश होऊन नौदलाच्या दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 4 October 2020

केरळमध्ये दोन नौदल अधिकाऱ्यांचा प्रशिक्षणावेळी अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पॉवर ग्लायडरवरचे नियंत्रण सुटल्यानं आणि क्रॅश झाल्यानं कोचीमध्ये रविवारी अपघात झाला.

कोची - केरळमध्ये दोन नौदल अधिकाऱ्यांचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पॉवर ग्लायडरवरचे नियंत्रण सुटल्यानं आणि क्रॅश झाल्यानं कोचीमध्ये रविवारी अपघात झाला. नौदलाच्या प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आयएनएस गरुडातून साउथर्न नेव्हल कमांडच्या नेवल एअर स्टेशनमधून ग्लायडर्सनी उड्डाण केलं होतं. या दुर्घटनेत लेफ्टनंट राजीऴ झा आणि इलेक्ट्रिकल एअर सुनिल कुमार या दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दोघेही नेहमीच्या प्रशिक्षणासाठी निघाले होते. 

सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांना ग्लायडर क्रॅश झाल्याचं दिसलं. त्यानंतर हार्बर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. नौदलाची टीम अपघातस्थळी पोहचल्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांना आयएनएस संजिवनी या नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 

हे वाचा - भाजपच्या आयटी सेल प्रमुखाने हाथरस पीडितेचा VIDEO केला शेअर; महिला आयोगाने दिला इशारा

मूळचे डेहराडूनचे असलेले राजीव झा हे 39 वर्षांचे होते. तर  29 वर्षांचे सुनिल कुमार बिहारचे होते. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश नौदलाने दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Navy officers lost their lives after glider crashed in kerala