सैन्याने वाजवली 'मोनिका, ओ माय डार्लिंग'ची धून; विरोधकांकडून टीका

सैन्याने वाजवली 'मोनिका, ओ माय डार्लिंग'ची धून; विरोधकांकडून टीका

नवी दिल्ली : राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा (Republic Day Parade) सराव सध्या सुरु आहे. वेगवेगळ्या सैन्यदलाचे सैनिक बँडचीही प्रॅक्टीस दररोज करत असतात. या सरावादरम्यानच ब्रेकमध्ये नेव्हीच्या बँडने बॉलिवूड गाण्याची धून वाजवल्यावर सैनिकही त्याचा आनंद घेऊ लागले. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. MyGov India च्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये 'मोनिका... ओ माय डार्लिंग' या गाण्याची धून ऐकू येते. यावर आता काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टीसहित अनेक पक्षांनी आक्षेप नोंवदला आहे. तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी याबाबत ट्विटरवर म्हटलंय की, भारतीय लष्कराचा अभिमान गेला उडत मात्र, मोदी-शहा यांचे सैन्यावर वर्चस्व आहे. एकीकडे बीटिंग रिट्रीट सोहळ्यात महात्मा गांधींची आवडती धून काढून टाकल्याने राजकारण रंगलेलं असताना आता या नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

त्यांनी म्हटलंय की, हा व्हिडीओ पाहून त्यांच्या शरीरावर शहारे आले नाहीत तर त्यांना उलटी येतेय. मात्र, लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारची मते या व्हिडीओवर आलेली आहेत. काहींनी म्हटलंय की, थोड्या काळासाठी विश्रांती करण्याचा अधिकार त्यांनाही आहे तर काहींनी म्हटलंय की हा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे.

विरोधक झाले आक्रमक

तृणमूलसोबतच युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बीवी श्रीनिवास यांनी ट्विट करत म्हटलंय की, या प्रजासत्ताक दिनाला 'मोनिका ओ माय डार्लिंग'... कुणी मला सांगेल का पुढे येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाला आणि प्रजासत्ताक दिनाला कोणतं असेल?

आम आदमी पक्षाच्या सोशल मीडिया टीमचे सदस्य कपिल यांनी म्हटलंय की, सिनेमा हॉलमध्ये राष्ट्रगीताची सक्ती आणि प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये मोनिका ओ माय डार्लिंग.... देशातील तमाशाकरण रोज नव्या उंचीवर जात आहे... दुसरीकडे शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी हा व्हिडीओ आवडल्याचं सांगितलंय.

बापूंची आवडती धून वाजणार नाही

'अबाइड विथ मी' ही धून यंदा बीटिंग रिट्रीट सोहळ्यात ऐकायला मिळणार नाही. ही धून महात्मा गांधींची आवडती धून असल्याचे म्हटले जाते. हे 1950 पासून दरवर्षी 29 जानेवारी रोजी उत्सवाच्या शेवटी वाजवली जाते. संरक्षण मंत्रालयाने बीटिंग रिट्रीट समारंभात वाजवल्या जाणार्‍या 26 ट्यूनची यादी जाहीर केली आहे, परंतु त्यात 'अबाइड विथ मी'चा समावेश केलेला नाही. याआधी 2020 मध्येही ही धून काढून टाकण्याची चर्चा होती, मात्र वादानंतर त्याचा समावेश करण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com