दहावी पास आहात; नौदलात नोकरी करण्याची आहे संधी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 जुलै 2019

भारतीय नौदलात दहावी उत्तीर्णांना संधी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संधी मिळत आहे. भारतीय नौदलात खलाशी या पदाच्या भरतीसाठी सप्टेंबर 2019मध्ये संगणक आधारित परीक्षा घेतली जाईल.

नवी दिल्ली : भारतीय नौदलात दहावी उत्तीर्णांना संधी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संधी मिळत आहे. भारतीय नौदलात खलाशी या पदाच्या भरतीसाठी सप्टेंबर 2019मध्ये संगणक आधारित परीक्षा घेतली जाईल.

1 एप्रिल 2000 आणि 31 मार्च 2003 (दोन्ही दिवस समाविष्ट) या दरम्यान, जन्मलेले अविवाहित तरुण अर्ज करू शकतील. मात्र उमेदवार दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. खलाशी नौदलात शेफ, स्टुअर्ड आणि हायजिनिस्ट म्हणून काम करतील.

खलाशी पदांसाठी www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: INDIAN NAVY RECRUITMENT in 2019 for 10th pass student