नौदलाचे ड्रोन अपघातग्रस्त; जीवितहानी नाही

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 मार्च 2018

या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. या अपघाताच्या प्राथमिक चौकशीत ड्रोनच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची शक्‍यता दिसून आली आहे

मुंबई - भारतीय नौदलाचे एक ड्रोन विमान आज (गुरुवार) अपघातग्रस्त झाले.

गुजरातमधील पोरबंदर येथील तळाजवळ हा अपघात झाला. उड्डाण घेतल्यानंतर काहीच वेळात हे ड्रोन कोसळल्याची माहिती देण्यात आली आहे.

""या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. या अपघाताच्या प्राथमिक चौकशीत ड्रोनच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची शक्‍यता दिसून आली आहे,'' असे नौदलाच्या प्रवक्‍त्याने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian navy's drone crashes in Gujarat