भारतीय नोटांवर नेपाळमध्ये बंदी

पीटीआय
शनिवार, 15 डिसेंबर 2018

काठमांडू : भारतीय चलनातील दोन हजार, 500 व 200 रुपयांच्या नोटांच्या वापरावर नेपाळने बंदी घातली आहे. हा निर्णय तत्काळ लागू करण्याचा आदेश नेपाळ सरकारने दिला असल्याचे वृत्त "काठमांडू पोस्ट' या प्रमुख दैनिकाने दिले आहे. 

"भारतीय चलनातील 100 रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या नोटांचा वापर करू नये किंवा जमाही करू नये,' असे आवाहन नेपाळ सरकारने केले असल्याचे माहिती व प्रसारणमंत्री गोकूळप्रसाद बासकोटा यांनी सांगितले, असे या वृत्तात म्हटले आहे. नेपाळमध्ये आता केवळ 100 रुपयांच्या भारतीय नोटेचाच स्वीकार केला जाणार आहे. नोटाबंदीच्या या निर्णयाचा फटका भारतात काम करणारे नेपाळी नागरिक व नेपाळला भेट देणारे भारतीय पर्यटकांना बसण्याची शक्‍यता आहे.

भारतात दोन वर्षांपूर्वी नोटाबंदी झाल्यानंतर दोन हजार, 500 व 200 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या होत्या. त्या वेळी 500 व एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर येथे कोट्यवधी रुपयांचे भारतीय चलन पडून आहे. नेपाळमधील बाजारातही तेव्हापासून नव्या नोटांचाच वापर केला जात होता. 

Web Title: Indian notes ban in Nepal