‘जनरल’ डब्याचा नियम बदलणार?

कोरोनाच्या आरोग्य नियमांनुसार रेल्वेच्या सर्वसाधारण डब्यातही (जनरल) क्षमतेइतक्या प्रवाशांनाच तिकिटे देण्याच्या धोरणाला सणासुदीच्या दिवसात प्रवाशांचा तीव्र विरोध होत आहे
railway
railwaysakal media

नवी दिल्ली : कोरोनाच्या आरोग्य नियमांनुसार रेल्वेच्या सर्वसाधारण डब्यातही (जनरल) क्षमतेइतक्या प्रवाशांनाच तिकिटे देण्याच्या धोरणाला सणासुदीच्या दिवसात प्रवाशांचा तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात हा नियम रेल्वेला बदलावा लागण्याचे चिन्ह आहे. त्याबाबतची घोषणा येत्या १-२ दिवसांतच अपेक्षित असल्याचे मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

बहुतांश सामान्य लोक जनरल डब्यातून प्रवास करतात. मात्र त्यांच्या या हक्कावरच कोरोनाचे नाव सांगून रेल्वेने गदा आणली. तीही लोकांनी सहन केली. मात्र दिवाळी व छटपूजेनिमित्त गावी जाऊ इच्छिणारा वर्ग आता वैतागले आहेत. प्रत्येक गाडी सुटण्याआधी जनरल डब्याची तिकीटविक्री सुरू होते व क्षमतेइतकी तिकीटे विकली गेल्यावर काही मिनिटांत ती बंदही होते त्यानंतर या डब्यांमध्ये पोलिस विनातिकीट प्रवाशांना आत शिरू देत नाहीत.

दिल्ली व अन्य महानगरांत लाखो असंघटित श्रमिक बाहेरील राज्यांतून आलेले असतात. दिवाळी व छटपूजेनिमित्त त्यांची गावी जाण्यासाठी धडपड चाललेली असते. मात्र या नियमामुळे त्यांना अडचणी सहन कराव्या लागत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com