विश्व स्कॉश स्पर्धेसाठी भारतीय संघात यश फडतेची निवड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

मुरगाव :17 वर्षाखालील  यू एस ओपन स्कॉश स्पर्धा जिंकणाऱ्या वास्को गोवा येथील यश फडते याची येत्या जुलै मध्ये भारतात चेन्नई येथे खेळविण्यात येणाऱ्या 19 वर्षाखालील विश्व स्कॉश स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

विश्व चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडण्यासाठी चेन्नई येथे निवड चाचणी शिबीर आणि खेळाडूंमध्ये सामने खेळविण्यात आले, यात यश फडतेने अपराजित राहून सर्व प्रतिस्परध्यावर विजय मिळविला. अंतिम सामन्यात त्याने महाराष्ट्रच्या वीर चोत्रांनी ह्याला पराभूत केले. यश फडते गोव्याचा प्रतिभाशाली युवा स्कॉशपटू आहे, गोव्यात स्कॉश खेळविषयी कोणतीच साधन सुविधा नसताना मुंबईत क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या स्कॉश कोर्टवर सराव करून त्यांनी आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त केले आहे

Web Title: indian squad for world squash championship