राफेलसाठी आणखी तीन वर्षांचे वेटिंग? 

वृत्तसंस्था
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

या विमानांची पहिली तुकडी हाती आल्यानंतर त्यांचे भारतीय वैमानिक आणि अभियंत्यांना प्रशिक्षण दिले जाईल. आतापर्यंत तीन वैमानिक आणि दोन तांत्रिक अधिकाऱ्यांनाच या विमानाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

नवी दिल्ली : "राफेल' या बहुचर्चित लढाऊ विमानांची पहिली तुकडी यंदा सप्टेंबर महिन्यामध्ये फ्रान्सकडून भारताला मिळणार असली तरीसुद्धा भारतीय मानके आणि प्रणालीनुसार तयार करण्यात आलेली ही विमाने हवाईदलामध्ये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी 2021 हे साल उजाडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या विमानांची पहिली तुकडी हाती आल्यानंतर त्यांचे भारतीय वैमानिक आणि अभियंत्यांना प्रशिक्षण दिले जाईल. आतापर्यंत तीन वैमानिक आणि दोन तांत्रिक अधिकाऱ्यांनाच या विमानाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

सप्टेंबर महिन्यामध्ये हे विमान भारतात आल्यानंतर 2020 पर्यंत हवाई दलातील वैमानिकांच्या तीन तुकड्यांना त्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian-standard Rafale jet to be ready by September 2021