तरुणांसाठी 'फिट इंडिया' अभियान सुरु व्हावे : पंतप्रधान

वृत्तसंस्था
रविवार, 25 मार्च 2018

''शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे योग्य मूल्य मिळावे, यासाठी देशातील कृषिबाजारांमध्ये सुधारणा घडविणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे''.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) 'मन की बात' या आपल्या आकाशवाणीवरील कार्यक्रमादरम्यान विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली. यामध्ये पंतप्रधानांनी शेतकरी आणि तरूणांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर भाष्य केले. देशातील तरूणांनी आपले आरोग्य उत्तम आणि सदृढ राखण्यासाठी 'फिट इंडिया' अभियान सुरु करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

Narendra modi mann ki baat

पंतप्रधान मोदींनी शेतकरी आणि तरुणांच्या दृष्टीने महत्वपूर्ण मत व्यक्त केले. मागील काही दिवसांपासून देशभरातील शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात वाढत असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी 'मन की बात'मध्ये याचा उल्लेख केला. ते म्हणाले, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे योग्य मूल्य मिळावे, यासाठी देशातील कृषिबाजारांमध्ये सुधारणा घडविणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे.

यावर्षी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी निर्णय घेण्यात आला असून, शेतमालाला उत्पादनापेक्षा दीडपट अधिक हमीभाव मिळावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, असे मोदींनी सांगितले.  
 

Web Title: For Indian Youth May start Fit India Campaign says PM Narendra Modi in Mann ki baat