भारताच्या डॉ. भारत वाटवाणी, सोनम वांगचुक यांना मॅगसेसे पुरस्कार

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जुलै 2018

डॉ. भारत वाटवाणी यांनी रस्त्यावर भटकणाऱ्या हजारो मनोरुग्णांना आधार दिला. त्यांच्यासाठी काम केले. तसेच अशा लोकांवर मोफत उपचार केले व त्यांची कुटुंबियांशी भेट घडवून आणली. तर सोनम वांगचुक यांनी निसर्ग, संस्कृती आणि शिक्षण या क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांची मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड झाली.

नवी दिल्ली : प्रतिष्ठित असा रोमन मॅगसेसे पुरस्कार आज (गुरुवार) जाहीर झाला. यामध्ये दोन भारतीयांच्या नावांचा समावेश आहे. भारताच्या डॉ. भारत वाटवाणी आणि सोनम वांगचुक यांना यंदाच्या मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मॅगसेसे पुरस्कार आशिया खंडातील नोबेल पुरस्कार समजला जातो.

डॉ. भारत वाटवाणी यांनी रस्त्यावर भटकणाऱ्या हजारो मनोरुग्णांना आधार दिला. त्यांच्यासाठी काम केले. तसेच अशा लोकांवर मोफत उपचार केले व त्यांची कुटुंबियांशी भेट घडवून आणली. तर सोनम वांगचुक यांनी निसर्ग, संस्कृती आणि शिक्षण या क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांची मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड झाली.

सोनम वांगचुक यांना प्रतिष्ठित असा रोमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात येणार आहे. वांगचुक यांनी संस्कृती आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले. डॉ. भारत वाटवाणी यांना त्यांच्या पत्नीने साथ दिली. या दोघांनी रस्त्यावर भटकणाऱ्या मनोरुग्णांना आपल्या खासगी क्लिनिकमध्ये नेत उपचार करत असे. तसेच त्यांना आश्रय देण्याचे काम केले. त्यांच्या या योगदानाची दखल घेत त्यांना मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.

Web Title: Indias Bharat Vatwani Sonam Wangchuk among Magsaysay award