Defense Industry : संरक्षण उद्योगात भारताची मोठी झेप

‘मेक इन इंडिया’सारख्या उपक्रमामुळे देशातच स्वदेशी बनावटीच्या युद्ध सामग्रीची वेगाने निर्मिती होऊ लागली असून मागील काही दिवसांमध्ये भारताने या क्षेत्रात मोठी झेप घेतल्याचे पाहायला मिळते.
Defense Industry
Defense Industrysakal

नवी दिल्ली - ‘मेक इन इंडिया’सारख्या उपक्रमामुळे देशातच स्वदेशी बनावटीच्या युद्ध सामग्रीची वेगाने निर्मिती होऊ लागली असून मागील काही दिवसांमध्ये भारताने या क्षेत्रात मोठी झेप घेतल्याचे पाहायला मिळते. एरव्ही परकी उत्पादनांवर अवलंबून राहणारा भारत अन्य देशांना देखील युद्ध सामग्रीचा पुरवठा करू लागला आहे. भारतीय संरक्षण उत्पादनांच्या बाजारपेठेचे मूल्य प्रथमच एक लाख कोटी रुपयांवर पोचले आहे.

अशीही मूल्य वाढ

  • १ लाख कोटी रुपये - २०२२-२३

  • ९५ हजार कोटी - २०२१-२२

  • १२ टक्क्यांपेक्षा - अधिकची वाढ

  • २०० टक्क्यांची वाढ - संरक्षण परवान्यांत

  • ७ ते ८ वर्षांत - मोठी वाढ झाली

  • २५ अब्ज डॉलर - (१.७५ लाख कोटी रुपये) २०२४-२५ पर्यंतची अपेक्षित उलाढाल

  • ५ अब्ज डॉलर - (३५ हजार कोटी) निर्यातीचे लक्ष्य २०२४-२५ पर्यंत

Defense Industry
RBI Announcement Today : 'या' तारखेपर्यंत बँकेत जमा करा दोन हजारांच्या नोटा; रिझर्व्ह बँकेचं चोख नियोजन

संरक्षणविषयक उत्पादनाला चालना

संरक्षण सामग्रीच्या उत्पादनादरम्यान येणारे अडथळे आणि समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकार हे उद्योगक्षेत्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी समन्वयाने काम करते आहे. यामाध्यमातून देशातील संरक्षण उत्पादनाला चालना देण्यात आली आहे. यासाठी अनेक उद्योगानुकूल निर्णय घेण्यात आले असून एमएसएमई आणि स्टार्टअपला पुरवठा साखळीत सामावून घेण्यात आले आहे, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com