पाकिस्तान हॉकी संघाविरुद्ध भारताचा क्‍लिनिकल स्ट्राइक

वृत्तसंस्था
रविवार, 23 ऑक्टोबर 2016

कुआनतान (मेलशिया) - पाकिस्तानविरुद्ध पराभूत होऊन भारतीय सैनिकांना आम्ही निराश करणार नाही, या कर्णधार श्रीजेशच्या वक्तव्याची प्रचिती हॉकी संघाने दिली. भारतीयांनी मागे पडल्यावर जोरदार प्रतिकार करीत पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना हार स्वीकारण्यास भाग पाडले. भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानवर सर्जिकल हॉकी स्ट्राइक केल्याचीच प्रतिक्रिया सोशल मीडियावर लगेचच उमटली.

कुआनतान (मेलशिया) - पाकिस्तानविरुद्ध पराभूत होऊन भारतीय सैनिकांना आम्ही निराश करणार नाही, या कर्णधार श्रीजेशच्या वक्तव्याची प्रचिती हॉकी संघाने दिली. भारतीयांनी मागे पडल्यावर जोरदार प्रतिकार करीत पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना हार स्वीकारण्यास भाग पाडले. भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानवर सर्जिकल हॉकी स्ट्राइक केल्याचीच प्रतिक्रिया सोशल मीडियावर लगेचच उमटली.

मलेशियात सुरू असलेल्या या स्पर्धेतील या सर्वांत महत्त्वाच्या लढतीच्या वेळी शांत राहण्याच्या; तसेच तणाव कमी करण्याच्या सूचना पाक हॉकीपटूंना संघव्यवस्थापनाने दिल्या होत्या. तरीही सामन्यातील तणाव कधीही कमी झाला नाही. भारतीयांनी दडपण वाढल्यावरही शांतपणे खेळ करीत पाकला पराभव स्वीकारण्यास भाग पाडले. भारताने क्रीडाजगताचे लक्ष लागलेल्या या लढतीत 3-2 अशी बाजी मारली.
भारतीय बचाव मोक्‍याच्या सामन्यात कोलमडतो; पण त्यांनी या वेळी सामन्याच्या सुरवातीस पाकचा झंझावात चांगलाच रोखला. नवोदित आक्रमक प्रदीप मोर याने 11व्या मिनिटास गोल करीत भारताचे खाते उघडले; मात्र पाकने हार मानली नव्हती. महंमद रिझवान थोरला (31), महंमद इरफान थोरला (39) यांनी गोल करीत पाकला आघाडीवर नेले. या पिछाडीनंतर भारतीय चांगलेच आक्रमक झाले. रूपिंदरने भारताचा सामन्यातील एकमेव पेनल्टी कॉर्नर 43व्या मिनिटास सत्कारणी लावला; तर दोनच मिनिटांत रमणदीप सिंगने तलविंदर सिंगच्या पासवर गोल करीत भारतास आघाडीवर नेले. आता भारताचे तीन सामन्यांनंतर सात गुण आहेत; तर पाकिस्तानचे तीन.
या स्पर्धेत पाकने दोनदा बाजी मारली आहे. या स्पर्धेत त्यांनी कोरियास हरवले असले आणि मलेशियाविरुद्ध हार पत्करली असली, तरी भारताविरुद्धच्या लढतीच्या वेळी हा इतिहास महत्त्वाचा नसतो. ऑलिंपिकला अपात्र ठरल्याने पाक हॉकी संघाची नाचक्की झाली आहे. ते भारतास हरवून देशात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांनी जोरदार सुरवात केली; पण गोलरक्षक श्रीजेश हार मानण्यास तयार नव्हता. त्याने या सामन्यात पराजित झालो, तर सैनिकांना दुःख होईल; ते देण्यास आम्ही तयार नाही, असे सांगितले होते. पाक आक्रमक जास्त उत्साही असताना भक्कम बचाव करीत त्यांची दमछाक केली आणि त्यानंतर योग्य वेळी क्‍लिनिकल स्ट्राइक करीत भारताने हा विजय मिळविला.

Web Title: India's clinical strike against Pakistan Hockey Team