CORONA UPDATES: देशातील आकडा 48 लाख पार; पाहा कशी वाढत गेली आकडेवारी

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 14 September 2020

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन  (Dr. HarshVardhan) यांनी मार्च 2021 पर्यंत कोरोनावरील लस उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. सर्वाधिक अत्यावश्यक श्रेणीत मोडणाऱ्या लोकांना पहिल्यांदा लस दिली जाईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसतोय. नव्याने आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. मागील 24 तासांतील 92,071 नवे रुग्ण आणि 1,136 मृतांसह  हा आकाडा आता  48,46,428  वर पोहचला आहे.  यात 9,86,598 सक्रीय रुग्णांचा समावेश असून आतापर्यंत देशात 79 हजार 722 लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.  

30 जानेवारी              पहिला रुग्ण आढळला
19 मे                    1 लाख रुग्ण
17 जुलै             10 लाख रुग्ण
23 ऑगस्ट             30 लाख रुग्ण

14 सप्टेंबर          48 लाख रुग्ण

देशातील कोरोना रुग्णांच्या बरे होण्याचे प्रमाण ७७.८८ टक्क्यांवर

भारतामध्ये 30 जानेवारी रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर 19 मे रोजी देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा एक लाख इतका झाला. 17 जुलै पर्यंत यात लक्षणीय भर पडली. देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने 10 लाखांचा टप्पा ओलंडला. 23 ऑगस्टला  30 लाख आणि 14 सप्टेंबरला या आकड्याने 48 लाखांचा पल्ला पार केलाय. ही आकडेवारी वेगाने वाढत असून चिंता वाढवणारी अशीच आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन  (Dr. HarshVardhan) यांनी मार्च 2021 पर्यंत कोरोनावरील लस उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. सर्वाधिक अत्यावश्यक श्रेणीत मोडणाऱ्या लोकांना पहिल्यांदा लस दिली जाईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात (    10,60,308+)  आहेत. हा आकडा दिवसागणिक वाढतानाचे चित्र पाहायला मिळते. त्यापाठोपाठ आंध्र प्रदेश (5,67,123+), तामिळनाडू (    5,02,759+), कर्नाटक (4,59,445+), उत्तर प्रदेश (3,12,036+) आणि दिल्ली (2,18,304 +) या राज्यांचा नंबर लागतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indias COVID19 case tally crosses 48 lakh mark with a spike of more than 92 thousand