plane
plane

Indian Air Strike : भारताची लढाऊ विमानं पाकवर पडतायत भारी!

नवी दिल्ली - भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत हल्ला करुन जैशच्या ठिकाणावर एक हजार किलोचा बॉम्बहल्ला केला. यामध्ये 300 पेक्षा जास्त दहशतवाद्याचा खात्मा झाला. यासाठी वापरण्यात आलेल्या मिराज विमांची वैशिष्ट्ये..

मिराज 2000
- मल्टिरोल लढाऊ विमान
- पाकिस्तानच्या हद्दीत खूप आतपर्यंत जाऊन हल्ला करण्याची क्षमता
- टार्गेट अचूक साधण्याची क्षमता या विमानात आहे 
- जमिनीच्या जवळ जाऊन देखील हल्ला करण्याची क्षमता.
-  दसॉल्ट मिराज 2000 लढाऊ विमान औपचारिकपणे 29 जून 1985 मध्ये भारतीय वायुसेनाच्या 7 क्रमांकाच्या स्क्वाड्रॉनमध्ये समाविष्ट करण्यात आले.
- कारगिल युद्धात मिराज लढाऊ विमान मोठ्याप्रमावर वापर करण्यात आला होता. 
- विमानाची लांबी 47 फूट
-  वजन- 7500 किलो 
- शस्त्रास्त्रांसह - 13,800 किलो 
- 2336 किमी प्रतितास स्पीड 
- 125 राउंड गोळ्या प्रती मिनिट फायरिंगची क्षमता
- 68 मिमीची 18 रॉकेट प्रती मिनट फायरिंगची क्षमता

यानंतर आज पाकिस्तानने भ्याड हल्ला करत भारताच्या नौशेरा आणि राजौरी भागात आपली विमाने घुसवली. यातील एक ए-16 विमान भारतीय हवाईदलाने पाडले..

पाकिस्तानच्या एफ - 16 विमानाचे वेशिष्ट्य
- एफ - 16 फायटर फल्कॉन, एक इंजिन असलेले सुपरसॉनिक मल्टीरोल फायटर एयरक्राफ्ट
- फोर्थ जनरेशनचे सर्वांत अत्याधुनिक फायटर प्लेन
- सर्वात अॅडव्हान्स रडार स्टिस्टीम (Active Electronically Scanned Array)
- GPS नेव्हीगेशन हे वैशिष्ट्य
- या विमानांमध्ये अॅडव्हान्स स्नायपर टार्गेटींग पॉड
- 2500 किलोमीटर प्रतितास स्पीड
- कोणत्याही हवामानात मारा करण्याची क्षमता
- अमेरिकेसह 25 देशांकडून याचा वापर होतो.
- 6000 राउंड गोळ्या प्रती मिनट फायरिंगची क्षमता
- विविध प्रकारची स्फोटकं घेऊन उडण्याची क्षमता

पाकिस्तानचे हे एफ 16 भारताच्या सुखोई विमानांनी पाडले.. सुखोई विमानांचे वैशिष्ट्य 

भारताच्या सुखोई एसयू - 30
- सुखोई एसयू-30 एमकेआय हे भारतीय वायुसेनेतील एक बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. 
- रशियाच्या सुखोई आणि भारताच्या हिंदुस्तान एअरोनॉटीक्स लिमिटेड ने याची निर्मिती केली आहे.
- लांबी : 21.935 मी 72.97 फुट)
- निव्वळ वजन : 18,400 कि.ग्रॅ.
- सर्व भारासहित वजन : 26,090 कि.ग्रॅ.
- कमाल वजन क्षमता : 37,800 किलो
- कमी उंचीवर : 1,350 किमी/तास स्पीड
   अति उंचीवर : 2,100 किमी/तास स्पीड
- हवेमध्ये इंधन भरण्याची क्षमता
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com