भारताच्या 'जीसॅट-11' उपग्रहाचे फ्रेंच गयानातून प्रक्षेपण

पीटीआय
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

बंगळूर : भारतातील ब्रॉडबॅंड सेवेला चालना देणाऱ्या "जीसॅट-11' या दूरसंचार उपग्रहाचे आज पहाटे फ्रेंच गयाना येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. भारताचा सर्वांत वजनदार उपग्रह आहे. 
फ्रेंच गयानातील कोऊरोऊ तळावरून एरीन-5 प्रक्षेपकाच्या साह्याने उपग्रहाचे भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे दोन वाजून सात मिनिटांनी प्रक्षेपण करण्यात आले.

बंगळूर : भारतातील ब्रॉडबॅंड सेवेला चालना देणाऱ्या "जीसॅट-11' या दूरसंचार उपग्रहाचे आज पहाटे फ्रेंच गयाना येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. भारताचा सर्वांत वजनदार उपग्रह आहे. 
फ्रेंच गयानातील कोऊरोऊ तळावरून एरीन-5 प्रक्षेपकाच्या साह्याने उपग्रहाचे भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे दोन वाजून सात मिनिटांनी प्रक्षेपण करण्यात आले.

सुमारे 33 मिनिटांनी उपग्रहाला जिओसिंक्रोनस कक्षेत सोडण्यात करण्यात आले. नंतर त्याला भूस्थिर कक्षेत (विषुववृत्तापासून अवकाशात 36 हजार किलोमीटर उंचीवर) स्थिर करण्यात येणार आहे. या उपग्रहामुळे प्रतिसेकंद 100 जीबी ब्रॉडबॅंड कनेक्‍टिव्हीटी मिळू शकणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) याची निर्मिती केली आहे. 
हा उपग्रह या वर्षी मार्च वा एप्रिल महिन्यात प्रक्षेपित करण्यात येणार होता. मात्र, जीसॅट - 6ए चे प्रक्षेपण अयशस्वी ठरल्यामुळे या उपग्रहाचे प्रक्षेपण लांबणीवर पडले होते.

जीसॅट - 6ए चे प्रक्षेपण 29 मार्च रोजी करण्यात आले होते. मात्र, प्रक्षेपित केल्यानंतर लगेचच याचा संपर्क तुटला होता. त्यानंतर जीसॅट-11चे प्रक्षेपण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुन्हा अनेक चाचण्या यशस्वी पार पाडल्यानंतर हा उपग्रह आता प्रक्षेपित केला आहे. "जीसॅट-11' उपग्रहामुळे संपूर्ण देशाचे भौगोलिक क्षेत्र अवाक्‍यात येऊ शकणार आहे. 

आजच्या प्रक्षेपणावेळी एरीन-5 प्रक्षेपकाद्वारे "जीसॅट-11' व्यतिरिक्त कोरियाच्या "जिओ-कोम्पसॅट'चेही प्रक्षेपण करण्यात आले. एरीन प्रक्षेपकाद्वारे आतापर्यंत भारताचे 22 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. येत्या काही महिन्यांत "जीसॅट-31' आणि "जीसॅट-30' या उपग्रहांचेही प्रक्षेपण करण्यात येणार आहे. 

"जीसॅट - 11'ची वैशिष्ट्ये 

- वजन 5854 किलो 
- कार्यकाल 15 वर्षे 
- सौर पंखे - चार मीटर 
- दूरसंचार सेवेसाठी 32 केयू व 8 केए बॅंड 
- या उपग्रहाने पूर्ण क्षमतेने काम केल्यास भारतातील इंटरनेटचा स्पीड प्रचंड वाढेल. 
-"जीसॅट - 11' च्या माध्यमातून 100 जीबी प्रतिसेकंद ब्रॉडबॅण्ड सेवा मिळू शकते. 
- ग्राम पंचायती, भारतनेट प्रकल्प आणि व्यापारी व सर्वसामान्य ग्राहकांना उच्च दर्जाची इंटरनेट सेवा मिळणार 

Web Title: Indias GSAT 11 satellite launches from French Guiana