जेएनपीटी'ला रॅन्समवेअर व्हायरसचा फटका

वृत्तसंस्था
बुधवार, 28 जून 2017

जेएनपीटी प्रशासनाकडून या कंपनीस मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रशासनाकडून कंपनीस कंटेनर ठेवण्यासाठी अतिरिक्‍त जागाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
रॅन्समवेअर व्हायरसच्या हल्ल्यांमुळे जगभरातील कंपन्यांना फटका बसला आहे

नवी दिल्ली - देशातील सर्वांत मोठे व्यापारी बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथील एका "टर्मिनल'वर रॅन्समवेअर व्हायरसचा हल्ला झाल्याची माहिती आज (बुधवार) जहाजबांधणी मंत्रालयाकडून देण्यात आली.

सागरी व्यापार वाहतूक क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योगसमूह असलेल्या "मेएर्स्क'ने त्यांच्यावर व्हायरस हल्ला झाल्याची माहिती दिली होती. या उद्योगसमूहावर "पेट्या' नावाच्या एका व्हायरसचा हल्ला झाल्याने "विविध ठिकाणी समस्या' निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. या हल्ल्याच्या झालेल्या परिणामांचा सध्या कंपनीकडून "अभ्यास' करण्यात येत आहे.

जेएनपीटी येथील एक टर्मिनल (गेटवे टर्मिनल्स इंडिया) या कंपनीकडून वापरण्यात येतो. या टर्मिनल क्षमता 18 लाख कंटेनर्सची वाहतूक करण्याएवढी आहे. मात्र व्हायरसचा हल्ला झाल्यामुळे येथील कामकाज बंद पडले आहे. जेएनपीटी प्रशासनाकडून या कंपनीस मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रशासनाकडून कंपनीस कंटेनर ठेवण्यासाठी अतिरिक्‍त जागाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
रॅन्समवेअर व्हायरसच्या हल्ल्यांमुळे जगभरातील कंपन्यांना फटका बसला आहे.

रशियामधील सर्वांत मोठी तेल उत्पादक कंपनी रोसनेफ्ट, जाहिरात क्षेत्रातील आघाडीचा उद्योगसमूह डब्ल्यूपीपी या कंपन्यांचाही यांमध्ये समावेश आहे. युरोपमधील कंपन्या या हल्ल्यांचे विशेष लक्ष्य झाल्या आहेत.

Web Title: India's largest container port JNPT hit by ransomware