भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

वृत्तसंस्था
रविवार, 2 एप्रिल 2017

उधमपूर- जम्मू काश्मीरमधील चेनानी ते नशरी या भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे आज(रविवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी तसेच जम्मु काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आदी मान्यवर उपस्थित होते. जम्मु-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हो बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्यामुळे जम्मु-श्रीनगर हा प्रवास 30 किलोमीटर ने कमी होईल आहे तर या प्रवासातील दोन तास वेळ वाचणार आहे.

देशातील या सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी 9.28 किलोमीटर आहे. 2011 साली या बोगद्याचे काम सुरु करण्यात आले होते. जवळपास सात वर्षाच्या अथक मेहनतीनंतर या बोगद्याचे काम पुर्ण झाले असुन त्यासाठी 3 हजार 700 कोटी रुपये इतका खर्च लागला.  या बोगद्यामुळे जम्मु-श्रीनगर अंतर कमी झाल्याने दरवर्षी तब्बल 99 कोटी रुपयांच्या इंधनाची बचत होणार आहे.

अत्याधुनिक सुरक्षा असलेल्या या बोगद्यामध्ये 124 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यासाठी बोगद्या बाहेर पोलिस तैनात असणार आहेत. 

जम्मु-श्रीनगर महामार्गावरील वाहतुकीला बर्फ आणि पावसामुळे वारंवार येणाऱ्या अडचणींवर हा बोगदा पर्याय ठरणार आहे. कोणत्याही ऋतुमध्ये या बोगद्यातुन विनाअडथळा वाहतुक करता येणार आहे. यामुळे जम्मु-कश्मिर मधील व्यापाराला अधिक चालना मिळणार आहे. 

Web Title: India's longest tunnel in Kashmir