भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानची ठाणी उध्वस्त

वृत्तसंस्था
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली: भारतीय जवानाचा शिरच्छेद करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याच्या सीमेनजीकच्या ठाण्यांवर भारतीय लष्कराने आज (बुधवार) जोरदार गोळीबार केला. पाकिस्तानने शस्त्रसंधीचा भंग करत कुरापती काढण्याचे प्रयत्न सुरूच ठेवलेले असताना भारतीय लष्कराने पूंछ, राजौरी, केल आणि माचिल भागात जोरदार प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी काल (मंगळवार) भारतीय हद्दीत घुसखोरी करून गोळीबार केला. यात दोन जवान हुतात्मा झाले. त्यानंतर त्यांनी एका जवानाचा शिरच्छेदही केला. यामुळे संतापलेल्या लष्कराने 'आता आमचे प्रत्युत्तर कडवे आणि झोंबणारे असेल,' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर भारतीय लष्कराने अचूक आणि जोरदार गोळीबार करत पाकिस्तानी ठाणी उध्वस्त केली.

भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी भारताने पाकिस्तानकडे अधिकृत निषेधही नोंदविला आहे. गेल्या दोन महिन्यांत पाकिस्तानने दोनदा मृतदेहाची विटंबना केली आहे. गेल्यावेळीही भारताने पाकिस्तानची प्रत्यक्ष ताबारेषेनजीकची ठाणी उध्वस्त केली होती.

प्रत्यक्ष ताबारेषेपलीकडील दहशतवाद्यांच्या तळावर भारताने 29 सप्टेंबर रोजी 'सर्जिकल स्ट्राईक' केले होते. त्यानंतर पाकिस्तानने 280 हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यात सुरक्षा दलाच्या 14 जवानांसह 26 जणांचा मृत्यु झाला आहे.

Web Title: India's reply to Pakistan's devastated stations