काहीसा दिलासा! मे महिन्यात किरकोळ महागाई दरात घट

वाढत्या महागाईमुळे RBI ने रेपो रेट 4 टक्क्यांवरून 4.90 टक्क्यांनी 90 बेस पॉईंटने वाढवला आहे.
inflation
inflationSakal

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या महागाईत (Inflation) सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा देणारी बातमी आली असून, भारताचा किरकोळ चलनवाढीचा (Retail Inflation) दर मे महिन्यात 7.04% इतका होता, जो एप्रिल महिन्याच्या तुलनेत किंचित कमी नोंदवण्यात आला आहे. एप्रिलमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 7.79 टक्क्यांवर पोहोचला होता. (Retail Inflation News)

inflation
महागाई वाढणार? RBI करणार आज रेपो दरात वाढ

सोमवारी जारी करण्यात आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार, कंज्यूमर प्राइस इंडेक्स आधारित किरकोळ चलनवाढीचा दर एप्रिलमध्ये 7.79% वरून घटून 7.04% झाला आहे. मे महिन्यात खाद्यपदार्थ, पेट्रोल-डिझेल आणि विजेच्या दरात कपात झाल्याने महागाईचा दर कमी झाला आहे.

उत्पादन शुल्कात कपात केल्याने महागाई कमी?

केंद्र सरकारने 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 8 आणि 6 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 6 राज्यांनीही व्हॅट कमी केला. त्यामुळे मालवाहतुकीचा खर्च कमी झाल्याने किरकोळ महागाई कमी झाल्याचे मानले जात आहे. मात्र, रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ कायम आहे. कच्चे तेल अजूनही प्रति बॅरल 120 डॉलरच्या वरच आहे. सरकारी तेल कंपन्या सध्या मोठ्या तोट्यात पेट्रोल आणि डिझेलची विक्री करत आहेत.

व्याजदरवाढीला ब्रेक लागणार ?
मे महिन्यात किरकोळ महागाई दर 7.04 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे, जो आरबीआयच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. परंतु एप्रिलच्या तुलनेत कमी आहे. गेल्या एका महिन्यात वाढत्या महागाईमुळे RBI ने रेपो रेट 4 टक्क्यांवरून 4.90 टक्क्यांनी 90 बेस पॉईंटने वाढवला आहे. दरम्यान, किरकोळ महागाई दरात झालेली घसरण पाहता आरबीआय कर्जाच्या व्याजदरात वाढ करणार नाही अशी आशा सामान्य नागरिकांना आहे. मात्र, हे सर्व पुढील काही महिन्यांच्या किरकोळ महागाईच्या आकडेवारीवर अवलंबून असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com