1 टक्का श्रीमंतांकडे देशातली 73 टक्के संपत्ती!

वृत्तसंस्था
सोमवार, 22 जानेवारी 2018

दावोस - गेल्या वर्षभरात देशाची 73 टक्के संपत्ती ही देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या 1 टक्के लोकांनाच प्राप्त झाली आहे, असे एका नव्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. वाढत्या उत्पन्नातील असमानतेची पातळी ही चिंतेचे चित्र निर्माण करत आहे. 

दावोस - गेल्या वर्षभरात देशाची 73 टक्के संपत्ती ही देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या 1 टक्के लोकांनाच प्राप्त झाली आहे, असे एका नव्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. वाढत्या उत्पन्नातील असमानतेची पातळी ही चिंतेचे चित्र निर्माण करत आहे. 

लोकसंख्येच्या सर्वात गरीब जनतेपैकी 67 कोटी भारतीयांच्या संपत्तीत मात्र केवळ 1 टक्क्यांनीच वाढ झाली आहे. हे सर्वेक्षण जगभरातील श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांच्या वार्षिक उत्पन्नाच्या वाढत्या आणि सामान्य लोकांच्या उत्पन्नाच्या घटत्या स्थितीला समोर आणणारे ठरले आहे. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफॅम या संस्थेने हा अहवाल प्रसिध्द केला आहे. देशात व जागतिक पातळीवर असलेली आर्थिक विषमता अहवालातून समोर आली आहे. ‘रिवॉर्ड वर्क, नॉट वेल्थ’असे या अहवालाचे नाव आहे. जगातील १० देशांमधील ७० हजार लोकांची मते जाणून घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. भारतातील ३७ टक्के अब्जाधीशांकडे वारसा हक्काने संपत्ती आल्याचे अहवालातून समोर आले आहे. गेल्या वर्षभरातील तयार झालेल्या एकुण संपत्तीपैकी 82 टक्के वाटा 1 टक्का लोकांकडे गेला आहे. तर लोकसंख्येच्या 3 अब्ज 70 लाख लोकांच्या संपत्तीमध्ये काहीच वाढ झाली नाही.   

ऑक्सफमच्या भारतातील सीईओ नीशा अग्रवाल यांनी 'केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक सोयीसुविधांचा लाभ फार थोड्या लोकांपर्यंत पोहोचतो हे अहवालातून दिसून आले आहे.' असे म्हणत या अहवालाबाबत चिंता व्यक्त केली. 

Web Title: India's richest 1% corner 73% of wealth generation: Survey

टॅग्स