ब्रिक्‍सला सहकार्याची भारताची इच्छा : स्वराज 

पीटीआय
मंगळवार, 5 जून 2018

ब्रिक्‍स देशांमधील सहकार्य आणखी समृद्ध करण्याच्या दिशेने योगदान देण्याची इच्छा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज येथे व्यक्त केली. 
 

जोहान्सबर्ग : ब्रिक्‍स देशांमधील सहकार्य आणखी समृद्ध करण्याच्या दिशेने योगदान देण्याची इच्छा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज येथे व्यक्त केली. 

पाच दिवसांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात स्वराज या ब्रिक्‍स देशांच्या (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेणार आहेत. या बैठकीत जोहान्सबर्गमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या गटाच्या वार्षिक शिखर संमलेनाचा पाया रचला जाण्याची अपेक्षा आहे.

दक्षिण आफ्रिका आणि लेसोथामधील भारताच्या उच्चायुक्त रुचिरा काम्बोज यांनी ब्रिक्‍स परराष्ट्रमंत्र्यांच्या शिखर संमलेनाच्या उद्‌घाटन समारंभात स्वराज यांच्या हवाल्याने सांगितले, की याठिकाणी आमची चर्चा आंतर ब्रिक्‍स सहकार्य पुढील काळात आणखी समृद्ध करण्याच्या दिशेने योगदान देईल. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी ब्रिक्‍स देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबर असलेल्या सुषमा स्वराज यांच्या छायाचित्रासह ट्विट केले असून, याठिकाणी विकास, तसेच बहुपक्षीयता कायम राखली जाईल, असे म्हटले आहे. 
 

Web Title: India's willingness to support BRICS says sushma Swaraj