इंडिगो विमानाचे टायर फुटल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात  

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 मार्च 2018

'तिरूपतीवरून हैदराबादला येणाऱ्या इंडिगो 6E 7117 या एअरक्राफ्टचे हैदराबाद येथे लँडिंग होत असताना अचानकपणे टायर फुटले. पण 73 प्रवासी, बालके व चार कर्मचाऱ्यांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.' असे इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हैदराबाद : बुधवारी सायंकाळी हैदराबाद विमानतळावर इंडिगो विमानाचे लँडिंग होताना टायर फुटल्याने विमानातील 77 लोकांनी पटापट उतरून पळ काढला. यात ते थोडक्यात बचावले. या विमानात 73 प्रवासी व बालकांना विमानाबाहेर काढण्यात कर्मचाऱ्यांना यश आले आहे, असे इंडिगो एअरलाईन्सने सांगितले. 

Tyre burst indigo airlines

हे विमान धावपट्टीवरच अडकून राहिल्याने इतर दोन विमानांना जवळच्या विमानतळावर लँडिंग करावे लागले. या विमानाचे टायर फुटल्याने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अधिकाऱ्यांना हा निर्णय घ्यावा लागला, असे सूत्रांनी सांगितले. 

'तिरूपतीवरून हैदराबादला येणाऱ्या इंडिगो 6E 7117 या एअरक्राफ्टचे हैदराबाद येथे लँडिंग होत असताना अचानकपणे टायर फुटले. पण 73 प्रवासी, बालके व चार कर्मचाऱ्यांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.' असे इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

इंडिगोने मागील नोव्हेंबर महिन्यापासून आपल्या ताफ्यात एअरक्राफ्ट विमानांचा वापर करायला सुरवात केली आहे. विमान धावपट्टीवर उतरतानाच त्याचा टायर फुटल्याने धावपट्टीवर अडसर निर्माण झाला. त्यामळे पुढील दोन विमाने ही बंगळूर विमानतळावर उतरवण्यात आली.

Web Title: indigo airlines accident due to Tyre burst on runway