IndiaGoची भन्नाट ऑफर, ९१५ रुपयांत करा विमान प्रवास; जाणून घ्या डिटेल्स

पंधरा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कंपनीनं प्रवाशांसाठी ही तीन दिवसीय ऑफर आणली आहे.
IndiGo
IndiGo

नवी दिल्ली : बजेट विमान कंपनी असलेल्या इंडिगो एअरलाईन्सने ९१५ रुपयांत प्रवासाची एक भन्नाट ऑफर आणली आहे. पंधरा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कंपनीनं प्रवाशांसाठी ही तीन दिवसीय ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार, १ सप्टेंबर २०२१ ते २६ मार्च २०२२ दरम्यान प्रवास करता येणार आहे. पण त्यासाठी ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान प्रवाशांना तिकीटं बुक करावी लागतील. इंडिगोच्या वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे.

"ही सेलिब्रेशनची वेळ आहे. कमी दरातील विमान प्रवासाची चांगली संधी सोडू नका. तर मग तुमच्या बॅगा भरा आणि तुमची आत्तापर्यंतची रखडलेली ट्रीप घडवा," असं ट्वीट इंडिगोनं केलं आहे. InterGlobe Aviation Limited (IndiGo) कडून आपल्या ग्राहकांसाठी नॉनस्टॉप डोमेस्टिक फ्लाईटचं बुकिंग ४ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ६.०० वाजल्यापासून ६ ऑगस्ट २०२१ च्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत करता येणार आहे. सर्व बुकिंग प्लॅटफॉर्म्सवर ही ऑफर लागू आहे.

IndiGo
मुंबई पालिकेत शिवसेना-काँग्रेस एकत्र?

या ऑफरनुसार, सूट असलेलं प्रवास भाडं ९१५ (सर्व करांसहित) रुपयांपासून सुरु होणार आहे. ही ऑफर १ सप्टेंबर २०२१ ते २६ मार्च २०२२ पर्यंतच्या विमान प्रवासासाठी लागू आहे. ही ऑफर एअरपोर्ट फी, चार्जेस तसेच सरकारी करांसाठी लागू नाही.

IndiGo
साडेसात लाख कॅन्सरच्या प्रकरणांमागे 'दारु' हे कारण; संशोधनाचा दावा

इंडिगोनं सांगितलं की, या ऑफर अंतर्गत मर्यादित यादी उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांना या यादीप्रमाणं डिस्काउंट उपलब्ध होईल. त्याचबरोबर ऑफर 6E Bagport, 6E Flex, Fast Forward आदी सेवांसाठी लागू होऊ शकते. यांची किंमत ३१५ रुपये तसेच भाड्यानं कारची सेवाही उपलब्ध असून ती ३१५ रुपयांप्रमाणं मिळेल असंही इंडिगोनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, टिकीट जर इंडिगोची वेबसाईट, अॅपवरुन HSBCच्या क्रेडिट कार्डनं बुक केल्यास अतिरिक्त ५ टक्के कॅशबॅक देण्यात येईल. जास्तीत जास्त ३०,००० रुपयांच्या बुकिंगवरही ही ऑफर लागू असेल असंही इंडिगोनं स्पष्ट केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com