इंदिरा बॅनर्जी सर्वोच्च न्यायालयाच्या आठव्या महिला न्यायाधीश

वृत्तसंस्था
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इंदिरा बॅनर्जी सर्वोच्च न्यायालयात न्यायधीश बनणाऱ्या आठव्या महिला न्यायाधीश आहेत. 

नवी दिल्ली : मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इंदिरा बॅनर्जी सर्वोच्च न्यायालयात न्यायधीश बनणाऱ्या आठव्या महिला न्यायाधीश आहेत. 

यापूर्वी फातिमा बीवी, सुजाता वी. मनोहर, रूमा पाल, ज्ञान सुधा मिश्रा, राजन प्रकाश देशाई, आर. भानुमति आणि इंदु मल्होत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायधीश म्हणून काम पाहिलेले आहे. शुक्रवारी राष्ट्रपतींनी दिलेल्या एका अधिसूचनेद्वारा हे सांगण्यात आले आहे की, राष्ट्रपती मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशपदी नियुक्त करत आहेत. 

दरम्यान, इंदिरा बॅनर्जी यांनी 5 एप्रिल 2017 रोजी मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीश पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांनी न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या जागेवर काम पाहिले होते.

Web Title: Indira Banerjee is only the 8th woman judge in Supreme Courts 68 years