राष्ट्रपती, पंतप्रधानांसह सोनियांचे इंदिरा गांधींना अभिवादन

पीटीआय
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदींसह कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अभिवादन केले.

सफदरजंग रोडवरील त्यांच्या घरी सर्व मान्यवरांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून त्यांना अभिवादन केले. अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या मुख्यालयात आज सकाळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यास माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी इंदिरा गांधी यांच्या भाषणाची एक ध्वनीफीतही ऐकविण्यात आली. दरवर्षी हा कार्यक्रम शक्ती स्थळावरच होतो; परंतु यंदा बर्ड फ्लू रोगाच्या प्रसारामुळे ते बंद ठेवण्यात आल्याने हा कार्यक्रम कॉंग्रेस मुख्यालयात घेण्यात आला.

Web Title: indira gandhi birth anniversary