खाद्यतेल स्वस्त होणार! इंडोनेशियाने पाम तेलावरील बंदी उठवली

या निर्णयामुळे आगामी काळात खाद्यतेलाच्या किमती कमी होऊ शकतात.
खाद्य तेल व तेलबियांवर साठेबंदीचा निर्णय मागे घ्यावा
खाद्य तेल व तेलबियांवर साठेबंदीचा निर्णय मागे घ्यावा sakal

नवी दिल्ली : इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महागाईने होरपळणाऱ्या देशातील सर्वसामान्यांसाठी दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे आगामी काळात खाद्यतेलाच्या किमती कमी होऊ शकतात. इंडोनेशियाने 23 मे पासून पाम तेलावरील बंदी उठवण्याची घोषणा केली आहे. गुरुवारी देशातील व्यापारी नेत्यांनी राष्ट्रपतींकडे निर्यात निर्बंध हटवण्याची मागणी केली होती, त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. (Indonesia Lift Ban On Palm Oil Exports)

भारत इंडोनेशियामधून पाम तेल मोठ्या प्रमाणात आयात करतो, परंतु इंडोनेशियाने देशांतर्गत किमती नियंत्रित करण्यासाठी इतर देशांना पामतेल देण्यास नकार दिला होता. मात्र, आता परिस्थिती सुधारल्याने इंडोनेशिया 23 मे पासून पाम तेल निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा भारतालाही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इंडोनेशिया पाम तेलाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक असून, भारताच्या वार्षिक गरजांपैकी 50 टक्के गरजा फक्त इंडोनेशिया पूर्ण करतो. भारतीय घरांमध्ये पाम तेल थेट स्वयंपाकात वापरले जात नाही परंतु त्याची उपस्थिती सर्वत्र आहे. खाद्यतेल ते सौंदर्य प्रसाधने, साबण, डिटर्जंट यासारख्या FMCG उत्पादनांमध्येही पाम तेलाचा वापर केला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com