आत्महत्येच्या तयारीतील विद्यार्थ्याला मित्र आणि शिक्षकाने वाचवले

यूएनआय
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

तो पोचला होता "ब्लू व्हेल सुसाइड चॅलेंज'पर्यंत

इंदूर: "ब्लू व्हेल' या जीवघेण्या ऑनलाइन गेमच्या नादामुळे शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून आत्महत्येच्या तयारीत असलेल्या सातवीतील विद्यार्थ्याला त्याचे वर्गमित्र आणि शिक्षकाने शुक्रवारी (ता. 11) वाचवले. हा विद्यार्थी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याच्या तयारीत असताना शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनी त्याला अडवले. मात्र, विद्यार्थ्याच्या या प्रयत्नामुळे शिक्षकांना धक्का बसला आहे.

पोलिस आणि मानसोपचार तज्ज्ञांनी "ब्लू व्हेल' या खेळाबाबत मुलांच्या ऑनलाइनच्या वापराबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ही घटना चिंताजनक आणि धोक्‍याचा इशारा देणारी आहे. हा मुलगा त्याच्या वडिलांच्या फोनवर बऱ्याच दिवसांपासून "ब्लू व्हेल' गेम खेळत होता, पण त्याच्या पालकांच्या हे लक्षात आले नव्हते. तो "ब्लू व्हेल सुसाइड चॅलेंज'पर्यंत पोचला होता, असे या मुलाच्या मित्रांनी सांगितले. या खेळाचा प्रत्येक टप्पा पार केल्यावर शरीरावर एक खूण करायची असते. या 50 खुणांनी व्हेल माशाचा आकार तयार करायचा असतो, असे या खेळातले नियम आहेत. मात्र, या गेममध्ये असतात तसे कापल्याच्या 50 खुणा त्याच्या शरीरावर आढळलेल्या नाहीत, असे पोलिसांनी सांगितले. त्याला आत्महत्येपासून रोखण्यात आल्यानं तो चिडचिडा झाला होता. या खेळाच्या आहारी जाऊन आतापर्यंत जगभरात शंभराहून अधिक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत.

पालक आणि मुलांमधील संवादाच्या अभावामुळे अशा घटना वाढतात. या आभासी जगातून मुलांना बाहेर काढून पुन्हा वास्तववादी जगात आणणे फार अवघड नाही, असे मध्य प्रदेश पोलिसांच्या मदत केंद्राच्या इंदूरचे निमंत्रक ग्यानेंद्र पुरोहित यांनी सांगितले. महाराजा यशवंतराव रुग्णालयाचे मानसोपचार तज्ज्ञ रामगुलाम राजदान म्हणाले, ""अशा खेळांमुळे मुलांच्या मनावर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. मुलांना बक्षिसाचे प्रलोभन आणि त्यांच्या क्षमतेला आव्हान देणारा खेळ धोकादायक आहे.''

ऑनलाइन खेळांपासून मुलांना दूर ठेवा
या मुलाची आई आणि स्थानिक महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्रा. श्रद्धा दुबे यांना मुलाच्या या प्रकाराची माहिती कळल्यावर मोठा धक्का बसला. आपण मुलाबरोबर अधिक खुलेपणानी संवाद ठेवू असे सांगितले. ""अशा ऑनलाइन खेळापासून आई-वडिलांनी मुलांना दूर ठेवले पाहिजे. मुलांशी संवाद ठेवला पाहिजे. तसेच त्यांच्याशी त्यांच्या आवडी-निवडीबाबत बोलले पाहिजे,'' असेही त्या म्हणाल्या.

Web Title: indore news student trying to suicide save friend and teacher