नसीरुद्दीन शहांना संघ-विहिंपने घेतले फैलावर

वृत्तसंस्था
शनिवार, 22 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्या विधानानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) नसीरुद्दीन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शहा यांचे वक्तव्य सांप्रदायिक आणि लोकशाहीविरोधात आहे. तसेच ते राजकीय अजेंड्यावर काम करत आहेत, असे संघाचे इंद्रेश शहा यांनी आज (शनिवार) सांगितले. 

समाजात मोठ्या प्रमाणावर विष पसरले आहे. यामुळे माझ्या मुलांना भारतात ठेवायला भीती वाटत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात तथाकथित गोरक्षकांनी एका पोलिस अधिकाऱ्याची हत्या केली होती. त्यावरही नसीरुद्दीन यांनी भाष्य केले होते. त्यावर इंद्रेश कुमार यांनी सांगितले, की अशाप्रकारचे वक्तव्य करणारे शहा भारतीय लष्करातील जवानांबाबतही असाच विचार करतात का? अशा सांप्रदायिक आणि असहिष्णू विचार असणाऱ्या लोकांच्या विचारांवर देश चालू शकत नाही. मग ते आमिर खान असो किंवा नसीरुद्दीन शहा. 

गोवंश हत्याबाबत ते म्हणाले, गाय हा एक आस्थेचा विषय मानला तर 2018 मध्ये यात काय अडचण आहे. या मुद्दावर चेष्टा करणे पाप आहे. यावर हिंसा व्हायला नको. 

Web Title: Indresh Kumar Criticizes Actor Naseeruddin Shah