भारतरत्नवर रतन टाटा म्हणाले, लोकांच्या भावना कौतुकास्पद पण...

सकाळ ऑनलाइन टीम
Saturday, 6 February 2021

सोशल मीडियावरुन मोठ्याप्रमाणात रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारे कॅम्पेन सुरु करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर रतन टाटा यांनी टि्वट करुन आपली भूमिका सर्वांसमोर मांडली आहे. 

नवी दिल्ली- सोशल मीडियावर प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न दिला जावा अशी मागणी केली जात आहे. यावर पहिल्यांदाच रतन टाटा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मला लोकांच्या भावनांचे कौतुक आहे परंतु, अशा मोहिमा बंद केल्या पाहिजेत, असे रतन टाटा यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावरुन मोठ्याप्रमाणात रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारे कॅम्पेन सुरु करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर रतन टाटा यांनी टि्वट करुन आपली भूमिका सर्वांसमोर मांडली आहे. 

सोशल मीडिया लोकांच्या मागण्या समोर आणण्याचे एक चांगले माध्यम झाले आहे. आता लोक टि्वटरवर आता उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न मिळावा अशी मागणी करत आहेत. त्यामुले शुक्रवारी हाच मुद्दा ट्रेंडिंगमध्ये होता. त्याचबरोबर सोशल मीडियावर एक विशेष अभियानही चालवले जात आहे. 

हेही वाचा- राकेश टिकैत म्हणाले, PM मोदींनी त्यांचा नंबर द्यावा, आम्ही कॉल करु

टि्वटमध्ये रतन टाटा म्हणाले की, सोशल मीडियावर लोकांच्या एका गटाकडून एका पुरस्कारावरुन व्यक्त करण्यात आलेल्या भावनांचे मी कौतुक करतो. परंतु, मी अत्यंत नम्रतेने आवाहन करतो की, अशाप्रकारच्या मोहिमा बंद कराव्यात. मी भारतीय असणे आणि भारताच्या विकासात योगदान देत असल्याबद्दल स्वतःला भाग्यशाली समजतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Industrialist Ratan tata requests users to stop social media campaign demanding bharat ratna award for him