पूँचमध्ये लष्कराने घुसखोरीचा कट उधळला

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

पाकिस्तानी सैन्याकडून काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांसाठी दहशतवाद्यांना मदत करण्यात येत आहे. आम्ही नुकतेच 300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याचे म्हटले होते. मेंधऱ सेक्टरमध्ये सीमेपलिकडून भारतीय हद्दीत घुसखोरी करत असलेल्या दहशतवाद्यांचा कट लष्कराकडून उधळून लावण्यात आला.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पूँच जिल्ह्यातील मेंधर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून करण्यात येणारा घुसखोरीचा कट भारतीय लष्कराकडून उधळण्यात आला.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याकडून काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांसाठी दहशतवाद्यांना मदत करण्यात येत आहे. आम्ही नुकतेच 300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याचे म्हटले होते. मेंधऱ सेक्टरमध्ये सीमेपलिकडून भारतीय हद्दीत घुसखोरी करत असलेल्या दहशतवाद्यांचा कट लष्कराकडून उधळून लावण्यात आला. गोळीबारानंतर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले.

मंगळवारी सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यापूर्वी सुंजवान येथील तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. काश्मीर खोऱ्यात लष्कराला लक्ष्य करून होत असलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. पीर पांजाल येथून अनेक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.

Web Title: Infiltration attempt by Pakistan in Jammu and Kashmirs Poonch foiled