लष्कराने पाच दहशतवाद्यांना धाडले यमसदनी !

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 जून 2017

उरी सेक्‍टरमधील नियंत्रणरेषेवर तैनात असलेल्या जवानांनी आज दुपारी सीमेपलीकडून होणारी दहशतवाद्यांची हालचाल टिपली. या दहशतवाद्यांना रोखण्याकरिता त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला

नवी दिल्ली - भारतीय लष्कराने आज (शुक्रवार) जम्मु काश्‍मीर राज्यातील बारामुल्ला जिल्ह्यामधील उरी सेक्‍टर येथे होत असलेला घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत पाच दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले.

"उरी सेक्‍टरमधील नियंत्रणरेषेवर तैनात असलेल्या जवानांनी आज दुपारी सीमेपलीकडून होणारी दहशतवाद्यांची हालचाल टिपली. या दहशतवाद्यांना रोखण्याकरिता त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांनीही यावेळी गोळीबार केला,'' अशी माहिती लष्कराच्या श्रीनगर येथील प्रवक्‍त्याने दिली.

गेल्या 24 तासांमध्ये दहशतवाद्यांनी भारतामध्ये घुसण्याचा केलेला हा तिसरा प्रयत्न आहे. या भागामध्ये आता लष्कराकडून मोठी शोधमोहिम राबविण्यात येत आहे.

Web Title: Infiltration bid foiled, 5 terrorists killed in Uri