घुसखोरांना केली पाक सैन्याने मदत

पीटीआय
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

जम्मू - दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत व्हावी, यासाठी पाकिस्तानच्या सैन्याने पूँच जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी केलेल्या जोरदार गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन जवान हुतात्मा झाले, तर दोन जवान आणि एक महिला जखमी झाले. भारतीय जवानांनी कृष्णा घाटी आणि पूँच सेक्‍टरमध्ये झालेले घुसखोरीचे दोन्ही प्रयत्न उधळून लावत पाकिस्तानच्या अनेक चौक्‍या उद्धवस्त केल्या. 

भारतीय लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा घाटी सेक्‍टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावताना एक जवान हुतात्मा झाला, तर पूँच सेक्‍टरमध्येही घुसखोरांना हुसकावून लावताना एक जवान हुतात्मा झाला, तर दोन जवान आणि एक महिला जखमी झाले. या दोन्ही ठिकाणी घुसखोरांना साह्य व्हावे, यासाठी पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचा भंग करत गोळीबार केला. कृष्णा घाटी येथील चकमकीत हुतात्मा झालेल्या जवानाची ओळख पटली असून, शीख रेजिमेंटचे जवान गुरुसेवक सिंग (वय 23) असे त्यांचे नाव आहे. पूँच येथे जखमी झालेल्या महिलेचे नाव सलीमा अख्तर असे असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पाकिस्तानी सैन्याने नागरी वस्त्यांनाही लक्ष्य करत उखळी तोफांनी मारा केला. ही चकमक अद्यापही सुरू आहे. 

काश्‍मीरमध्ये तीनशे दहशतवादी 
जम्मू काश्‍मीरमधील सध्याची स्थिती अत्यंत नाजूक असून, राज्यामध्ये तीनशे दहशतवादी फिरत असल्याची माहिती राज्याचे पोलिस महासंचालक के. राजेंद्र यांनी दिली. तसेच, सीमेपलीकडून घुसखोरीचाही सातत्याने प्रयत्न होत असल्याने प्रचंड तणाव निर्माण झाल्याचे राजेंद्र यांनी सांगितले. बुऱ्हाण वणीच्या मृत्यूनंतर निर्माण झालेला अंतर्गत तणाव अद्यापही कायम असून, दहशतवाद्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे पुढील दोन ते तीन महिने आवश्‍यक ते उपाय योजावे लागणार असल्याचेही ते म्हणाले. 

अधिक सैन्य तैनात 
येथे एका किशोरवयीन मुलाला विष देऊन मारल्याच्या आरोपानंतर येथे काही ठिकाणी हिंसाचार झाल्याने श्रीनगरमध्ये आणखी सैन्य तैनात करण्यात आले आहे. फुटीरतावाद्यांच्या "बंद'मुळे सलग 121 व्या दिवशी काश्‍मीर खोऱ्यातील जनजीवन विस्कळित होते.

Web Title: Infiltrators helped Pakistan