राफेलप्रकरणी न्यायालयात दिलेली माहिती चुकीची : शरद पवार

वृत्तसंस्था
शनिवार, 15 डिसेंबर 2018

मुंबई : महालेखापाल (कॅग) आणि लोकलेखा समितीने करारातील किमतीचा दिलेला हा तपशील तपासला होता, असे केंद्र सरकारने न्यायालयात सांगितले. मात्र, ही माहिती चुकीची आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शनिवार) सांगितले. तसेच  राफेल प्रकरणात मी सर्वोच्च न्यायालयात निकालाची प्रत वाचली आहे, असेही ते म्हणाले.

फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या कराराच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळल्या. त्यानंतर आज शरद पवार यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, ''केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या माहितीच्या आधारे राफेल विमान खरेदी करार प्रकरणावर निर्णय देण्यात आला. केंद्राच्या दाव्यानुसार कॅगच्या अहवालाची लोकलेखा समितीत चर्चा झाली होती. मात्र, त्यांचा हा दावा चुकीचा असून, सर्वोच्च न्यायालयापासून वस्तूस्थिती लपविण्यात आली''.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयासमोर कॅग अहवालाबाबत चुकीची माहिती दिली आहे. राफेल करारावर याचप्रकारे निर्णय आला आहे. जर हा अहवाल आला नसेल तर सरकारने खोटे का बोलले? त्यामुळे सरकारने यावर माफी मागावी, असे काँग्रेसचे लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले होते. 

Web Title: Information provided to court in Rafael Deal is wrong says Sharad Pawar