esakal | 'इन्फोसिस' प्रकरणावरुन रा. स्व. संघाचा यूटर्न; दिलं 'हे' स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Infosys

'इन्फोसिस' प्रकरणावरुन रा. स्व. संघाचा यूटर्न; दिलं 'हे' स्पष्टीकरण

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : 'इन्फोसिस' या आयटी कंपनीकडे व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या इन्कम टॅक्सच्या पोर्टलमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अडचणी येत आहेत. यावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र पांचजन्यमधून वादग्रस्त लिखाण करण्यात आलं होतं. भारतीय अर्थव्यवस्थेवर हल्ला करण्यासाठी देशविरोधी शक्तींकडून हा कट-कारस्थानाचा प्रयत्न असल्याचं एका लेखामध्ये म्हटलं होत. यावरुन मोठा गदारोळ झाल्यानंतर आता संघानं यूटर्न घेतला असून संबंधीत लेखाचं ते वैयक्तिक मत असून आमचं नाही, असं म्हटलं आहे.

नारायण मूर्ती संस्थापक असलेल्या बंगळुरुस्थित इन्फोसिसवर रा. स्व. संघाच्या मुखपत्रात चार पानांच्या कव्हर स्टोरीमधून टीका करण्यात आली होती. यामध्ये म्हटलं की, "राष्ट्रविरोधी शक्ती भारताच्या अर्थव्यवस्थेवर आघात करण्याचा प्रयत्न करत आहेत." मात्र, संघाचे प्रवक्ते सुनिल अंबेरकर यांनी ट्वीट करुन संघटनेची भूमिक स्पष्ट केली. ते म्हणाले, "एक भारतीय कंपनी म्हणून इन्फोसिसचं भारताच्या विकासात महत्वाचं योगदान आहे. या कंपनीकडून ऑपरेट होणाऱ्या इन्कम टॅक्सच्या पोर्टलमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या. त्यावरुन पांचजन्य या आमच्या मुखपत्रातून प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये मांडण्यात आलेले विचार हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत, ते पांचजन्यचे विचार नाहीत. त्यामुळे या लेखामध्ये मांडण्यात आलेले विचार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नाही."

हेही वाचा: रवी शास्त्री कोविड पॉझिटिव्ह; इतर दोन कोचसह चौघे आयसोलेशनमध्ये!

गेल्या महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांची बैठक झाली होती. यावेळी नव्या इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये गोंधळ निर्माण झाल्यावरुन अर्थमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच यावेळी इन्फोसिसला १५ सप्टेंबरपर्यंत सर्व अडचणी सोडवण्याची डेडलाईन देण्यात आली होती.

हेही वाचा: कोरोनाची लस खरी की बनावट कशी ओळखाल?

हे पोर्टल लॉन्च झाल्यानंतर त्यामध्ये सुमारे अडीज महिने काही ना काही अडचणी येत होत्या. गेल्या महिन्यात सलग दोन दिवसात इन्कम टॅक्स पोर्टल सलग दोन दिवस बंद होतं. त्यामुळं युजर्स चांगलेच वैतागले होते, त्यांना वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता येत नव्हतं. त्यामुळे अखेर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिसच्या सीईओंना समन्स बजावून हजर राहण्याचे आदेश दिले होते.

loading image
go to top