इन्फोसिस करणार दहा हजार अमेरिकन कर्मचाऱ्यांची भरती!

पीटीआय
मंगळवार, 2 मे 2017

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अमेरिका फर्स्ट' हे धोरणाची अंमलबजावणीचे एक पाऊल म्हणून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस या नामवंत कंपनीने पुढील दोन वर्षात तब्बल दहा हजार अमेरिकन कर्मचाऱ्यांना नोकरी देणार असल्याचे जाहीर केले आहे.

सॅन फ्रान्सिस्को: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अमेरिका फर्स्ट' हे धोरणाची अंमलबजावणीचे एक पाऊल म्हणून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस या नामवंत कंपनीने पुढील दोन वर्षात तब्बल दहा हजार अमेरिकन कर्मचाऱ्यांना नोकरी देणार असल्याचे जाहीर केले आहे.

ट्रम्प यांच्या धोरणामुळे भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी आपले धोरण बदलण्यास सुरूवात केली आहे. अलिकडेच टीसीएस आणि इन्फोसिस या भारतीय कंपन्या 'एच-1बी' व्हिसा नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे अमेरिकेने म्हटले होते. या कंपन्या व्हिसा लॉटरी पद्धतीद्वारे अतिरिक्त अर्ज करून मोठ्या प्रमाणात व्हिसा मिळवित असल्याचे व्हाईट हाऊसनने म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर इन्फोसिसने कर्मचारी भरतीवेळी अमेरिकन नागरिकांना प्राधान्य देण्याचे नवे धोरण आखले आहे. 'कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात काम करण्यासाठी अमेरिकन नागरिकांना कंपनीने यापूर्वीच नोकऱ्या दिल्या आहेत. इन्फोसिसने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रकल्पावर काम करण्यासाठी आतापर्यंत दोन हजार अमेरिकन कर्मचाऱ्यांना रोजगार दिला आहे', अशी महिती इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

ट्रम्प यांनी 'बाय अमेरिका', 'हायर अमेरिका' अर्थात अमेरिकन वस्तू, सेवाच खरेदी करा आणि अमेरिकन युवकांनाच रोजगार द्या, अशा स्वरुपाचा आदेश काढला आहे.

अर्थविषयक बातम्यांसाठी क्लिक करा

Web Title: Infosys plans to hire 10,000 American workers, open 4 US tech centers