esakal | मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांना पोलिसांकडून अमानुष मारहाण; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
sakal

बोलून बातमी शोधा

mp farmer.png

मध्यप्रदेशमधील गुना जिल्ह्यात भाड्याच्या जमीनीवर शेती करणाऱ्या शेतकरी पती-पत्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर हे प्रकरण देशभरात चांगलंच जोर पकडताना दिसत आहे.

मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांना पोलिसांकडून अमानुष मारहाण; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

भोपाळ-  मध्यप्रदेशमधील गुना जिल्ह्यात भाड्याच्या जमीनीवर शेती करणाऱ्या शेतकरी पती-पत्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर हे प्रकरण देशभरात चांगलंच जोर पकडताना दिसत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या प्रकरणी एक व्हिडिओ ट्विट करत मध्य प्रदेश सरकारवर हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांवर पोलिस करत असलेल्या अत्याचाराचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी 'आमची लढाई असा विचार आणि अन्यायाविरोधात आहे' असं म्हटलं आहे.  

भारतातील तीन राज्यांत भूकंप; अशी आहे सद्यस्थिती...
गुनाचे एसपी स्थानिक पोलिस प्रशासनाला घेऊन सरकारी जमीनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे राहणाऱ्या शेतकरी पती-पत्नीने याला विरोध केला. त्यावेळी पोलिसांनी बळजबरीने त्यांना जागेवरुन हटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पती-पत्नीने विष प्राशन केले. त्यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेची स्थिती नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे. 

पती-पत्ती भाड्याच्या जमीनीवर शेती करतात. त्यांच्या नावावर 3 लाखांचे कर्ज आहे. अशावेळी शेतातून मिळणाऱ्या उत्पनातून ते आपलं कर्ज फेडणार होते. पण प्रशासनाने सर्व शेतावर जेसीबी चालवला. अशावेळी पती राजकूमारने पोलिस प्रशासनाला विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण तो असहाय्य ठरल्याने पोलिसांसमोरच त्याने विष प्राशन केले. 
 
जिल्ह्यात उद्यापासून लॉकडाउन, सकाळी सात वाजेपर्यंत कडकडीत बंद
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेची गंभीर दखल घेत उच्च स्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी गुनाचे जिल्हाधिकारी आणि एसपी यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेमुळे देशभर संतापाची लाट आहे. काँग्रेसने या मुद्द्यावरुन शिवराज सिंह सरकारवर टीका केली आहे.

पीडित राजकुमार अहिरवार गेल्या अनेक वर्षांपासून येथील जमीनीवर शेती करतात. मंगळवारी अचानक अतिक्रमण पथक त्यांच्या शेती जवळ आले आणि त्यांनी सर्व शेतीवर जेसीबी चालवणे सुरु केले. राजकुमारने याला विरोध केल्याने पोलिसांनी त्याला मारहाण केली. राजकुमारच्या म्हणण्यानुसार याच जमीनीवर त्याच्या वडील आणि आजोबांनी शेती केली आहे. राजकुमारच्या कुटुंबात 10 ते 12 जण आहेत. आता जमीन नसल्याने त्याच्या कुटुंबीयांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्व निर्माण झाला आहे.

loading image