कुऱ्हाडीने घाव घालून दिल्लीत प्रेयसीची हत्या

वृत्तसंस्था
शनिवार, 8 एप्रिल 2017

राजधानी दिल्लीतील लेबर कॅम्प परिसरात एका महिलेची कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील लेबर कॅम्प परिसरात एका महिलेची तिच्याच प्रियकराने कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

लेबर कॅम्पमधील ओखला फेज-1 मध्ये ही घटना घडली. मृत महिला 38 वर्षांची होती. ती विवाहित होती. मात्र पतीसोबत राहत नव्हती. ज्या प्रियकरासोबत राहत होती, त्यानेच तिची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

हत्येच्या अन्य एका प्रकरणात गुरुवारी रात्री एका मंदिरात तीन जणांनी एका व्यक्तीची धारदार चाकूने वार करत हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांनी अटक केली आहे. गुरुवारी रात्री मृत व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत एका मंदिरात दर्शनासाठी आला होता. त्यावेळी मंदिरात दडून बसलेल्या त्याच्या मित्रांनी पूर्वद्वेषातून त्याच्यावर हल्ला केला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस उपायुक्त रोमिल बानिया यांनी दिली.

Web Title: Inhumanity at its worst! Lady allegedly chopped to death by lover in Delhi