'लिहून घ्या, योगी जाणार' म्हणताच 'आप' आमदारावर शाईफेक

टीम ई सकाळ
Monday, 11 January 2021

शाई फेक ज्यांच्यावर झाली त्या आप आमदार सोमनाथ भारती यांनासुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. अमेठी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. 

लखनऊ - दिल्लीचे माजी कायदे मंत्री आणि आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांच्यावर उत्तर प्रदेशातील रायबरेली इथं शाई फेकण्यात आली. त्यांनी याचा आरोप भाजप नेत्यावर केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्यांनी सांगितलं की, आप आमदारावर करण्यात आलेल्या शाई फेकीची चौकशी सुरु आहे.

सोमनाथ भारती हे सध्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. यातच ते सोमवारी रायबरेली इथं गेले होते. त्यावेळी त्यांची उत्तर प्रदेश पोलिसांसोबत खडाखडी झाली. दरम्यान, एका व्यक्तीने त्याचवेळी सोमनाथ यांच्यावर शाई फेकली. या घटनेचा व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला आहे. यामध्ये भारती म्हणतात की, लिहून घ्या योगी जाणार. त्यांच्या या वक्तव्यावेळीच कोणीतरी शाई फेकत योगी कुठेच जाणार नाही असं म्हटलं. 

शाई फेकीच्या घटनेनंतर सोमनाथ भारती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना टार्गेट केलं आहे. मुख्यमंत्र्यांचे खरे नाव अजय सिंह बिश्त असा उल्लेख करत ते गुंड असल्याचं म्हटलं. त्यांची गुंडगिरी जनतेच्या समोर पाहू असंही भारती यांनी म्हटलं. सगळ्या राज्यात सांगेन. इथं महिलांवर अत्याचार होतायात. मुलींची अब्रू लुटली जात आहे. 

हे वाचा - डोळ्यासमोर काळ अन् गळ्याभोवती बांधलेल्या स्टोलमुळे वाचली तरुणी; अंगावर काटा आणणारी घटना

दरम्यान, शाई फेक ज्यांच्यावर झाली त्या आप आमदार सोमनाथ भारती यांनासुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. अमेठी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. अमेठीच्या पोलिस अधीक्षकांनी सांगितलं की, सोमनाथ भारती यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता. या प्रकरणातच त्यांना रायबरेलीतून अटक करण्यात आली. सोमनाथ भारती यांनी उत्तर प्रदेशातील रुग्णालयाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जगदीशपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ink attack on aap mla somnath-bharti-in-rae-bareli-video-viral