मोदींकडून प्रेरणा; चहावाला लढवतोय निवडणूक!

वृत्तसंस्था
शनिवार, 13 ऑगस्ट 2016

उदयपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेत शहरातील 24 वर्षे वयाचा एक चहाविक्रेता विधि महाविद्यालयाच्या अध्यक्षपदाची निवडणूकीला उभा राहिला आहे. ‘जर एक चहावाला पंतप्रधान होऊ शकत असेल, तर विधि महाविद्यालयाचा अध्यक्ष का नाही?‘, असा मजकूर त्याच्या सर्व प्रचारसाहित्यावर वापरण्यात आला आहे.

पवन दास वैष्णव नावाचा हा तरुण विधि अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला आहे. त्यापूर्वी त्याने व्यवसाय व्यवस्थापन (बिझनेस मॅनेजमेंट) विषयात पदवी आणि वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी मिळविली आहे. पाच भावांमध्ये पवन सर्वांत लहान आहे. शहरातील एका लोकप्रिय तळ्याकाठी त्याच्या वडिलांचे चहाचे दुकान आहे. गेल्या दहापेक्षा अधिक वर्षांपासून पवन त्याच्या वडिलांना चहा आणि स्नॅक्‍स विक्रीसाठी दुकानात मदत करत आहे. उच्चशिक्षण घेतल्यानंतर बहुतेक तरुणांचा ओढा चांगल्या नोकरी किंवा व्यवसायाकडे असतो. अशा परिस्थितीत पवन चहाविक्री करत आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला, "मला असे वाटते की चांगले शिक्षण घेतल्यानंतरही प्रत्येकाने आपली पार्श्‍वभूमी आणि कुटुंबाचा व्यवसाय विसरू नये.‘ तसेच "मोदीजी जर लाखो तरुणांना प्रेरणा देत असतील तर मी त्यापासून दूर कसा असेल आणि चहाविक्रीचा त्यांचा आणि माझा व्यवसाय सारखाच आहे‘, असेही तो म्हणाला.

महाविद्यालयातील तास आणि निवडणुकीचा प्रचार सांभाळून दररोज वडिलांना चहाविक्रीसाठी मदत करत असल्याचेही पवनने सांगितले. महाविद्यालयीन स्तरावरील निवडणुकांमध्ये फारसा राजकीय हस्तक्षेप नसतो. मात्र अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने पवनला पाठिंबा दर्शविला आहे.

Web Title: Inspiration from Modi; Cahavala election!