विमा कंपन्यांकडे कोट्यवधी रुपये पडून ; 'आयआरडीए'ची माहिती

Insurance companies fall by billions says IRDA information
Insurance companies fall by billions says IRDA information

नवी दिल्ली : देशभरातील विविध विमा कंपन्यांकडे कोट्यवधी रुपयांची रक्कम अशा स्थितीत पडून आहे, की त्यावर अद्याप कोणीही हक्क सांगितलेला नाही. ही रक्कम तब्बल 15 हजार 167 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (आयआरडीए) दिली आहे. 

आपल्या पश्‍चात कुटुंबीयांची हेळसांड होऊ नये, त्यांचा उदरनिर्वाह सुरळीत सुरू राहावा, या उदात्त हेतूने कोट्यवधी नागरिकांनी त्यांचा विमा उतरविला आहे. मात्र, त्यात अनेक जण असे आहेत, की त्यांचा मृत्यू झाला असून, त्यांनी काढलेल्या विम्याची त्यांच्या कुटुंबीयांना कल्पनाच नाही. असे विमाधारक व त्यांच्या वारसांचा शोध घ्यावा, अशा सूचना "आयआरडीए'ने विमा क्षेत्रातील 23 कंपन्यांना केल्या आहेत. कुटुंबातील कोणी विमा उतरविला होता का, याचा शोध पॉलिसी क्रमांक, जन्मतारीख, पॅनकार्ड व इतर पुराव्यांआधारे वारसांना घेता यावा, यासाठी संबंधित कंपन्यांनी आपल्या संकेतस्थळावर तशी सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही "आयआरडीए'ने दिले आहेत. 

मार्च 2018 पर्यंत विमा कंपन्यांकडे अशी 15 हजार 166 कोटी रुपयांची रक्कम पडून आहे. त्यात एकट्या एलआयसीकडे 10 हजार 509 कोटी, तर इतर 22 खासगी विमा कंपन्यांकडे 4 हजार 657 कोटी रुपये पडून असल्याचे "आयआरडीए'ने सांगितले. 

बेवारस रकमेचा  कंपनीनिहाय तपशील 

- एलआयसी ः 10,509 
- आयसीआयसीआय : 807.4 
- रिलायन्स ः 696.12 
- एसबीआय ः 678.59 
- एचडीएफसी ः 659.3 
- बिर्ला सनलाइफ ः 252 
- इतर ः 601 
(आकडे कोटी रुपयांत) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com