जम्मूमधील मंदिरांवर हल्ल्याचा पाकचा नापाक मनसुबा, गुप्तचरांची माहिती

पाच ऑगस्ट किंवा स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्टला दहशतवादी संघटना मंदिरांवरील हल्ल्याचा कट प्रत्यक्षात आणू शकतात.
जम्मूमधील मंदिरांवर हल्ल्याचा पाकचा नापाक मनसुबा, गुप्तचरांची माहिती

नवी दिल्ली: पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना (Pak terror groups) जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तयबा जम्मूमधील मंदिरांवर हल्ला करण्याचा कट आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी (Intel suggests) दिली आहे. राज्यात आणि देशात जातीय तणाव निर्माण करण्याचा त्यांचा त्यामागे उद्देश आहे. या अलर्टच्या पार्श्वभूमीवर जम्मूमध्ये (jammu) सुरक्षा बंदोबस्त (security) वाढण्यात आला आहे. (Intel suggests Pak terror groups plotting attacks on Jammu temples high alert sounded dmp82)

पाच ऑगस्ट किंवा स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्टला दहशतवादी संघटना मंदिरांवरील हल्ल्याचा कट प्रत्यक्षात आणू शकतात. पाच ऑगस्टला जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द करुन दोन वर्ष पूर्ण होणार आहेत. या पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनांची जम्मूमधील मंदिरांजवळच्या गर्दीच्या ठिकाणी स्फोटके पेरण्याची योजना असू शकते, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

जम्मूमधील मंदिरांवर हल्ल्याचा पाकचा नापाक मनसुबा, गुप्तचरांची माहिती
विदर्भातील व्यावसायिकाने मुंबईतील हॉटेलमध्ये मॉडेलवर केला बलात्कार

अलीकडेच जम्मूमधील IAF च्या बेसवर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला होता. यापूर्वी तीन वेळा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे, असे नॉर्थ ब्लॉकमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. IED पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर होऊ शकतो, असे दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com