'हायब्रिड अल्ट्रा' चा खोऱ्यातील हत्यांशी संबंध, गुप्तचर यंत्रणांना संशय

हत्याकांड घडवून आणणाऱ्या या तरुणांना पाकिस्तानी हँडलर्सकडून पिस्तुले देण्यात आली.
jammu.
jammu.

जम्मू -काश्मीरमधील नागरिकांच्या हत्येमागे असणारे तरुण अद्याप पोलिस किंवा गुप्तचर यंत्रणांच्या रडारवरील नावे नाहीत. ते नव्याने भरती करण्यात आले आहेत. मात्र गुप्तचर सूत्रांनी यासंदर्भात महत्वाची माहिती दिलीय. हत्याकांड घडवून आणणाऱ्या या तरुणांना पाकिस्तानी हँडलर्सकडून पिस्तुले देण्यात आली. आणि नंतर हत्यारं परत घेण्यात आली. ज्यामुळे दहशत पसरवणाऱ्यांना लोकवस्तीत सोयीस्करपणे लपण्यासाठी मुभा मिळाली.

पिस्तुले परत घेतल्याने हत्याकांड घडवून गर्दीत गायब होण्यास मदत मिळाली, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. खून करून हे तरुण पुन्हा आपापल्या घरी सहजपणे जाण्यात यशस्वी ठरले. गुप्तचर यंत्रणांणी या नव्या दहशतवादाला 'हायब्रिड अल्ट्रा' असं संबोधलं आहे.

नव्याने भरती करण्यात आलेले हे दहशतवादी पाळत ठेवून हल्ले करतात. यावेळी ते सर्व्हिलियन्सपासून बाचव करत हल्ला चढवतात. पाकिस्तानमध्ये लपलेले त्यांचे मास्टरमाईंड यासाठी मदत पुरवतात.

आजकाल नव्याने भरती केलेल्या तरुणांना पाकिस्तानी दहशतवादी सॉफ्ट टार्गेट करतात. तसेच व्यक्तींना मारण्यासाठी हँडलर्स लहान शस्त्रे देणं पसंत करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com