वाजू लागले इफ्फीचे पडघम... 

वाजू लागले इफ्फीचे पडघम... 

पणजी : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) गोव्याची राजधानी पणजी येथे पार पडणार आहे. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या 'इफ्फी'साठी नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे. यावर्षी 'इफ्फी'मध्ये एकूण 80 देश सहभागी होणार असून त्यातील 64 देशांनी आपली मान्यता दिली आहे. इफ्फीच्या तयारीचे पडघम राजधानी पणजीत वाजण्यास सुरवात झाली असून अवघ्या काही दिवसातचं गोव्यात चित्रपटांचा मेळा भरणार आहे. 

मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही इफ्फीसाठीचे प्रवेशशुल्क एक हजार रुपये प्रतिव्यक्‍ती असणार आहे. ज्या प्रतिनिधींनी यापूर्वी इफ्फीत आपला सहभाग दोन वर्षे नोंदविला आहे, त्यांची प्रतिनिधी नोंदणी चोवीस तासाच्या आत तर नवीन प्रतिनिधींची नावनोंदणी अठ्‌ठेचाळीस तासांच्या आत स्वीकारली जाणार आहे. विद्यार्थ्यांना इफ्फीसाठी नेहमीप्रमाणे विनाशुल्क प्रवेश दिला जाणार आहे. यावर्षीच्या इफ्फीचा उद्‌घाटन सोहळा श्‍यामाप्रसाद स्टेडिअम, बांबोळी येथे होणार असून ओपनिंग फिल्म कला अकादमीत दाखविला जाणार आहे. ज्यांना नावनोंदणी करायची आहे, त्यांनी www.iffigoa.org या बेवसाइटवर प्रतिनिधी नोंदणी करावी. 

ज्या कपूर घराण्याला भारतीय सिनेमाची शान समजले जाते, अशा कपूर घराण्यावर चित्रित करण्यात आलेल्या चित्रपटांचा सहभाग विशेष चित्रपट विभागात करण्यात आला आहे. या विभागाच्या माध्यमातून पृथ्वीराज कपूर यांच्यापासून ते रणबीर कपूरपर्यंत सर्वांचे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. चित्रपटाचे खेडे नावाच्या विभागात रोज सायंकाळी नऊ वाजल्यानंतर लाइव्ह संगीताचा कार्यक्रम असणार असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे डीजे आणि त्यांचे संगीत या माध्यमातून ऐकता येणार आहे. 5.1 साउंड सिस्टीमच्या क्षमतेसह एकूण चार थिएटर कार्यरत राहणार असून प्रत्येक थिएटरची क्षमता 150 जागांची असणार आहे. 

यावर्षीच्या इफ्फीसाठी कंट्री फोकस म्हणून इस्राईल या देशाची निवड करण्यात आली आहे. यावर्षी डिझाईन कन्सल्टंट म्हणून भूपाल रामनाथकर हजेरी लावणार आहेत. गेल्यावर्षी सुरू करण्यात आलेला बायोस्कोप विभाग यशस्वी झाला असून यावर्षीच्या बायोस्कोप विभागाचा आनंदही इफ्फीतील सहभागींना घेता येणार आहे. चित्रपटाशी निगडित असणाऱ्या तांत्रिक बाबी युवकांना शिकता याव्यात म्हणून स्किल स्टुडिओचा लाभही यावर्षी चित्रपटाबाबत जाणून घेण्यात उत्सुक असणाऱ्या युवकांना घेता येणार आहे. 21 ते 27 नोव्हेंबर या काळात 'कट्‌टा' नावाचा उपक्रमही सुरू करण्यात येणार असून चित्रपट क्षेत्रातील एका नामांकित व्यक्‍तीशी या कट्याच्या निमित्ताने चर्चा करता येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com