esakal | ...आता केंद्र सरकारला लागले वेध; कशाचे ते वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

hardeep singh puri

क्वारंटाइनचा नियम लागू नाही
विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चौदा दिवस क्वारंटाइन राहण्याचा नियम लागू नसेल. मुळात कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला विमानतळाच्या आवारात प्रवेशच मिळणार नाही, त्यामुळे विलगीकरणाचा प्रश्‍न गैरलागू आहे, असा युक्तिवादही पुरी यांनी केला. आता या निर्णयामुळे वेगळाच वाद उफाळण्याची शक्‍यता आहे. यापूर्वी कामगार आणि विमान प्रवाशांना मिळणाऱ्या भिन्न वागणुकीवरून समाज माध्यमांतून प्रचंड टीका झाली होती. दुसरीकडे रेल्वे बुकिंग करताना प्रत्येक प्रवाशाला क्वारंटाइन नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय ऑनलाइन बुकिंग प्रक्रिया सुरू होणार नाही.

सध्या रेल्वे प्रवास, खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांना  क्वारंटाइन होणे बंधनकारक आहे. प्रत्येकाला विमान प्रवासानंतर 14 दिवस क्वारंटाइन करणे व्यवहार्य नाही, असेही पुरी यांनी म्हटले आहे.

हे बंद

  • जेवण, नाश्‍ता
  • लाऊंजमधील वर्तमानपत्रे
  • नियतकालिके 
  • ट्रॉली सेवा

...आता केंद्र सरकारला लागले वेध; कशाचे ते वाचा सविस्तर

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गाची तमा न बाळगता देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याच्या निर्णयापाठोपाठ केंद्राने आता आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची तयारी केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यास जून-जुलैपूर्वीच आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करता येईल. 25 मे पासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे केंद्रीय विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी विमानसेवा सुरू करण्याबाबत फेसबुक लाइव्हदरम्यान प्रश्नांच्या उत्तरात ही माहिती दिली. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी कोरोना संकटामुळे ऑगस्ट-सप्टेंबरपूर्वी आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा करणे शक्य असल्याचे सांगितले होते. कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेण्यात येईल, त्यानंतर हा निर्णय होईल असेही त्यांचे म्हणणे होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र, दुसऱ्या एका उत्तरादरम्यान मंत्री पुरी यांनी आपले आधीचे म्हणणे खोडून काढताना, कोरोनासोबत जगण्याचा मार्ग सापडल्यास आणि  परिस्थिती सुधारल्यास जून-जुलैपूर्वीच आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील सुरू करता येईल. आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्यासाठी विमानतळ प्राधिकरण आणि विमान कंपन्या पूर्णपणे तयार आहेत असे त्यांनी नमूद केले.

कोरोना नव्हे तर या कारणामुळे राजस्थानमधील जिल्ह्यात कर्फ्यूचा माहोल

उड्डाणांची संख्या वाढविणार
देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना मंत्री पुरी म्हणाले, ‘‘ की 25 मे पासून 33 टक्के उड्डाणे सुरू होणार आहेत. ताज्या आकडेवारीनुसार बुकिंगच्या पहिल्याच दिवशी बऱ्याच लोकांनी तिकिटे काढली आहेत. मागणी जास्त असल्यास उड्डाणांची संख्या वाढविण्यात येईल. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन प्रवाशांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार विमानतळावर दोन तास आधी पोचणे, मास्क वापरणे,  सामाजिक अंतर पाळणे, कोरोनाची लक्षणे नसल्याचे स्वतःहून सांगणे बंधनकारक असेल. त्यानंतरच प्रवाशांना बोर्डिंग पास मिळेल.’’

कोरोनाचे थैमान सुरुच; 144 नवे रुग्ण आढळले

पुरी म्हणाले

  • तिकिटांच्या परताव्यासाठी नियम निश्‍चित केले आहेत
  • रद्द झालेल्या विमानांचे भाडे कंपन्यांनाच परत करावे लागेल 
  • वंदे भारत मिशनच्या माध्यमातून  25 हजार 465 भारतीय मायदेशी
  • महिना अखेरपर्यंत 50 हजार लोकांना मायदेशी आणले जाणार
  • आठ हजार जणांना परदेशात पोचविण्यात आले
  • देशभरात एक हजार टन वैद्यकीय उपकरणे व इतर आवश्यक सेवा विमानांद्वारे पोचविल्या