आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव सुरू

सोमवार, 9 जानेवारी 2017

यंदा या महोत्सवात 160 पतंग तज्ज्ञांनी सहभाग घेतला असून, यामध्ये 31 देशांतील 114 जणांसह भारताच्या विविध राज्यांतील 51 लोकांचाही समावेश आहे. गुजरात सरकार आणि पर्यटन महामंडळातर्फे दरवर्षी भरविला जाणारा हा महोत्सव यंदा 14 जानेवारीपर्यंत म्हणजेच संक्रातीपर्यंत सुरू राहणार आहे.

अहमदाबाद - येथील साबरमती नदीच्या किनारी आज सकाळी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला सुरवात झाली. राज्यपाल ओ. पी. कोहली, मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नीतीन पटेल यांच्या हस्ते या महोत्सवाची सुरवात झाल्यानंतर देश-विदेशांतील पतंगप्रेमींनी मोठा जल्लोष केला.

यंदा या महोत्सवात 160 पतंग तज्ज्ञांनी सहभाग घेतला असून, यामध्ये 31 देशांतील 114 जणांसह भारताच्या विविध राज्यांतील 51 लोकांचाही समावेश आहे. गुजरात सरकार आणि पर्यटन महामंडळातर्फे दरवर्षी भरविला जाणारा हा महोत्सव यंदा 14 जानेवारीपर्यंत म्हणजेच संक्रातीपर्यंत सुरू राहणार आहे. आज परदेशी पतंग प्रेमींच्या पतंगांनी आकाश रंगबिरंगी झाले होते. यामध्ये चीनचा ड्रॅगनच्या आकाराचा पतंग, अनेक कार्टून्स, पक्षी आदींच्या आकारांत पतंग तयार करण्यात आले आहेत. असेच महोत्सव आता वडोदरा, सुरत आणि राजकोटसह 14 राज्यांमध्ये भरविण्यात येणार असून, यंदा व्हायब्रंट गुजरात परिषदेसाठी आलेले मान्यवरही या महोत्सवाला भेट देणार असल्याचे समजते.

Web Title: International Kite Festival begins