'डॉटर'ला सर्वाधिक पसंती; महोत्सवाला वाढता प्रतिसाद

बर्दापूरकर
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

पणजी - येथे सुरू असलेल्या 47 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) तिसरा दिवस इराणच्या रेजा मिरकरीमी दिग्दर्शित "डॉटर' या चित्रपटाने गाजवला. हृदयाला भिडणारी कथा, कौटुंबिक मूल्यांची पाठराखण करणारी पार्श्‍वभूमी व देखण्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. क्रोएशियाचा "ऑन द अदर साइड' आणि फिनलंडचा "हॅपिएस्ट डे इन द लाइफ ऑफ ओली माकी' यांनीही प्रेक्षकांची मने जिंकली.

कथा आणि मांडणीतील वेगळेपणामुळे इराणच्या चित्रपटांबद्दल प्रेक्षकांना कायमच उत्सुकता असते. यंदा "डॉटर'ने प्रेक्षकांना खूष केले. इराणमधील एका छोट्या शहरातील ही गोष्ट. उच्च शिक्षणासाठी कॅनडामध्ये निघालेल्या आपल्या वर्गमैत्रिणीच्या पार्टीसाठी मुलीला तेहरानला जायचे असते; मात्र, वडील नकार देतात. घरच्या इतरांना विश्‍वासात घेत ती विमानाने तेहरानला पोचते; पण पार्टीवरून परत येताना ती तेथेच अडकते. चिडलेले वडील मोटारीतून तेहरानकडे निघतात. या दोघांची तेथील भेट, पुन्हा चुकामूक व त्यातून घडलेल्या कौटुंबिक नाट्याची ही कथा. बहुतांश भारतीय मूल्यांचा पुरस्कार करणारी ही कथा देश-विदेशातील प्रेक्षकांना भावली.
क्रोएशियाच्या "ऑन द अदर साइड' या चित्रपटामध्ये पन्नाशीच्या एका महिलेची कथा मांडण्यात आली आहे.तर, फिनलंडच्या "हॅपिएस्ट डे इन द लाइफ ऑफ ओली माकी'मध्ये एका बॉक्‍सरची कथा हलक्‍या फुलक्‍या शैलीत मांडण्यात आली आहे.

Web Title: international movie mahotsav