इसिस कनेक्‍शनवरून केरळचा युवक ताब्यात

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 जुलै 2017

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाने केरळच्या एका संशयित व्यक्तीस "इसिस'शी संबंध असल्याच्या कारणावरून ताब्यात घेतले. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ कारवाई करत आरोपीकडून बनावट पासपोर्टही जप्त केला आहे.

संशयित आरोपीचे नाव शहाजहान वेलुवा (वय 32, रा. कन्नोर, केरळ) असे सांगण्यात येत आहे. या संशयिताबद्दल अमेरिकेच्या सीआयए संस्थेने प्राथमिक माहिती पुरवली होती. बनावट पासपोर्टच्या आधारे संशयित दहशतवादी सीरियाला जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. विशेष तपास पथकाचे अधिकारी एम. एम. ओबेरॉय यांनी या कारवाईच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र तपास सुरू असल्याने या संदर्भात अधिक माहिती देण्यास नकार दिला. ओबेरॉय म्हणाले, की संशयित दहशतवाद्याचे नेटवर्क शोधण्याचे काम सुरू आहे. आमचे पथक देशातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या तपास यंत्रणांबरोबर मोहीम राबवत आहे. या संशयिताची आणि त्याच्या नेटवर्कसंदर्भात मिळालेली माहिती गोळा केली जात आहे.

Web Title: international news marathi news sakal news